Saturday, April 27, 2024
Homeनगरअवैध दारु विक्री व जुगार व्यवसायावर 11 ठिकाणी छापे

अवैध दारु विक्री व जुगार व्यवसायावर 11 ठिकाणी छापे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर व तालुक्यात सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारु, अवैध देशी-विदेशी विक्रीच्या ठिकाणासह जुगार व्यवसाय करणार्‍या अशा 11 ठिकाणी श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पोलीस पथकाने छापे टाकून कारवाई करत 74700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी 11 जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

श्रीरामपूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या हातभट्टी गावठी दारुसह देशी-विदेशी दारु विक्री केली जाते तसेच जुगार व्यवसाय सर्रासपणे चालू असल्याच्या माहितीवरुन श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, सहाय्यक फौजदार मुकुंद कणसे, सहाय्यक फौजदार कृष्णाजी गोडगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण, पोलीस नाईक हबीब पठाण, सचिन धनाड, फुरकान शेख, काकासाहेब मोरे, नितीन भालेराव, पोलीस कॉन्स्टेबल शहाबाज पटेल, सतिष पठारे, आकाश भैरट यांच्या पथकाने तालुक्यात विशेष मोहीम राबवून 11 ठिकाणी छापे टाकले.

यात प्रशांत चंद्रभान हरार (सम्राटनगर, श्रीरामपूर) 1210 रुपये रोख रक्कम, ताराचंद्र रामचंद्र अहिरे (कुर्‍हे वस्ती, श्रीरामपूर) 1250 रुपये रोख, भारत खंडू पाटील (बोंबले वस्ती, श्रीरामपूर) 1160 रुपये रोख, राजेंद्र दगडू गायकवाड (नांदूर, ता. राहाता) 22500 रुपयाची गावठी हातभट्टीची दारु व रसायन, सुरैय्या समशेरखान पठाण (रा. मस्तान चौक, श्रीरामपूर) 7500 रुपयाची गावठी हातभट्टीची दारु, मनोज इंद्रमन राजपूत (सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर) 2320 रुपयाची देशी दारु, दिपक अशोक जाटे (गळनिंब, ता. श्रीरामपूर) 27690 रुपये किंमतीची देशी-विदेशी दारुसह मोटारसायकल, मेहबूब बाबू शेख (चितळी, ता. राहाता) 1400 रुपये किंमतीची देशी-विदेशी दारु, रविंद्र राजेंद्र गायकवाड (जळगाव ता. राहाता) 1200रुपये किंमतीची देशी-विदेशी दारु, रामदास सिताराम भिंगारे (उंदिरगाव, ता. श्रीरामपूर) 6060 रुपये किंमतीची देशी-विदेशी दारु, संजय पुंडलीक भनगडे (रा. उंदिरगाव, ता. श्रीरामपूर) 2410 रुपये किंमतीची देशी विदेशी दारु अशा 11 ठिकाणी छापे टाकून या पथकाने 74700 रुपयांचा ऐवज व रोख रक्कम जप्त केली आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर व तालुक्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 8 व महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये 3 असे एकूण 11 जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या