Thursday, April 25, 2024
Homeनाशिकउत्तर महाराष्ट्रातून दिवसाला १६ हजार शिवभोजन थाळ्यांची विक्री

उत्तर महाराष्ट्रातून दिवसाला १६ हजार शिवभोजन थाळ्यांची विक्री

नाशिक । Nashik

लाॅकडाऊन काळात शिवभोजन थाळीचा लाभ घेणार्‍यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रात दिवसाला १६ हजार ९२५ शिवभोजन थाळ्यांची विक्रि होत आहे.

- Advertisement -

दिवसेंदिवस वाढती मागणी बघता उत्तर महाराष्ट्रात तीन हजार थाळ्या वाढवणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मागील वर्षी लॉकडाऊनमुळे या थाळीचा दर पाच रुपये करण्यात आला होता. मागील १५ एप्रिलपासून शिव भोजन थाळी मोफत वितरीत केली जात असून आहे. येत्या १४ जूनपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली आहे. गोरगरीबांना त्याचा सर्वाधिक फायदा होत आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या पंधरा तालुक्यांना 138 शिवभोजन थाळी केंद्र असून दिवसाला सात हजार थाळ्या वितरित केले जातात. थाळीच्या वितरणात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असून उत्तर महाराष्ट्रासाठी तीन हजार शिवभोजन थाळ्या वाढीव वितरित केल्या जाणार असल्याची माहिती विभागीय महसूल कार्यालयातील तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी दिली आहे.

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत मिळून सध्या १६ हजार ९२५ शिव भोजन थाळी वितरीत होत आहेत. नाशिक जिल्ह्यात ४५ शिवभोजन केंद्र असून सात हजार शिवभोजन थाळी वितरित होत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात २८ शिवभोजन केंद्र असून ३ हजार ५०० शिवभोजन थाळ्या वितरित होतात. जळगाव जिल्ह्यात ३८ शिवभोजन केंद्रे असून ३ हजार ४२५ थाळ्यांची विक्रि होते.

धुळे जिल्ह्यात १५ शिवभोजन केंद्र असून या ठिकाणी दीड हजार तर नंदुरबार जिल्ह्यात १२ शिवभोजन केंद्र असून दीड हजार शिवभोजन थाळ्या वितरित केल्या जातात.

- Advertisment -

ताज्या बातम्या