Sunday, April 28, 2024
Homeजळगावग्रा.पं.कर्मचार्‍यांना वेतन वाढ !

ग्रा.पं.कर्मचार्‍यांना वेतन वाढ !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यातील 3 हजार ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना महाराष्ट्र राज्य सरकारने 10 ऑगस्ट2020 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार सर्व ग्राम जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सुधारित किमान वेतन लागू करावी.त्याचबरोबर या वेतनात एक ते 30 जून 2021 कालावधीतील सुधारित राहणीमान भत्ता 403 लागू करावा. यासंदर्भात जळगाव जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे यांनी 22 जुलै रोजी परिपत्रक जारी केले.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सुधारीत किमान वेतन वाढ झालेली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्यात आला. शासनाने 100 टक्के अनुदान देवून ग्राम पंचायतींनी आकृतीबंध फरक न करता, सरसकट कर्मचार्‍यांना वेतन अदा करण्यासाठी ग्रा.प.कर्मचारी महासंघांचा लढा सुरुच राहणार.

- Advertisement -

अमृत महाजन, राज्य सहसचिव, ग्रा.प.कर्मचारी महासंघ

जळगाव जिल्ह्यातील 1015 च्यावर ग्रामपंचायतीतील 3 हजाराच्यावर कर्मचार्‍यांना या सुधारित किमान वेतनामुळे 5625 ते 7025 रुपये एवढी घसघशीत वाढ होणार आहे. शिवाय दर सह महिन्यांनी जो सुधारित राहणी मान भत्ता तोही देणे पंचायतींना बंधनकारक ठरणार आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी 16 जून 2021 रोजी जळगाव जिल्हा परिषद रस्ता रोको आंदोलन केलं होते.

यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात कर्मचार्‍यांना 10 ऑगस्ट2020चे परिपत्रकाप्रमाणे पगार व सुधारित राहणीमान भत्ता लागू करावा हीदेखील प्रमुख मागणीचा समावेश होता.

त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक व ग्रामपंचायत विभागाचे अव्वल कारकुन श्री. बोराडे यांनी संघटनेने दिले परिपत्रक यांच्या पडताळणी करून 22 जुलै रोजी श्री.बोटे यांच्या सहीने जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकार्‍यांना सूचित करण्यात आले.

आयटकतर्फे निर्णयाचे स्वागत !

जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे, कार्यालयीन अधीक्षक मराठे, दीपक वराडे व कक्ष अधिकारी यांचे आभार मानले.

यात जळगाव जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ जिल्हा शाखातर्फे राज्य सहसचिव अमृत महाजन, जिल्हाध्यक्ष संतोष खरे, किशोर कनडारे, सुभाष कोळी, शिवशंकर महाजन, राजेंद्र हिरे भडगाव, संदीप देवरे, गोविंदा पाटील, चाळीसगाव, अशोक गायकवाड, अमोल महाजन, प्रकाश रल, कैलास साळुंखे( चोपडा), शंकर दरी, संजय कांडारे रावेर, प्रदीप जोशी, पिंटू साळुंखे,(यावल), रतिलाल पाटील, विठ्ठल कोळी, राजेंद्र कोळी धरणगाव, राजेंद्र खरे (पाचोरा), तुषार मोरे, अशोक जाधव एरंडोल, कौरव पाटील, ज्ञानदेव क्षीरसागर (जामनेर) आदींनी जि.प.ग्रामपंचायत प्रशासनाचे स्वागत केले आहे.

ग्रा.पं. कर्मचार्‍यांमध्ये आनंद

ग्रामपंचायतींना वेतन पदाधिकार्‍यांना कागदपत्र शोधण्याची गरज भासू नये म्हणून याआधीच्या बरोबर संबंधित सर्व सहपत्रे जोडण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या सुधारित वेतन व राहणीमान भत्ता लागू करण्याच्या आदेश देण्यात आला.

या आदेशामुळे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांमध्ये आनंद पसरला असून जिल्हा परिषदेने यासंदर्भात नुकतेच परिपत्रक काढले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या