Wednesday, April 24, 2024
Homeनगरसाकुरी जि. प. शाळेसमोरील रस्त्याच्या कामास गती द्या; अन्यथा रास्ता रोका

साकुरी जि. प. शाळेसमोरील रस्त्याच्या कामास गती द्या; अन्यथा रास्ता रोका

राहाता |वार्ताहर| Rahata

तालुक्यातील साकुरी गावात ग्रामपंचायत कार्यालय व मराठी शाळेसमोर सुरु असलेले कॉक्रीटीकरणाच्या रस्त्याच्या काम अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे पंचक्रोषीतील नांदुर्खी, डोहाळे, कोर्‍हाळे यासह इतर गावांच्या दळणवळणाच्यादृष्टीने असलेल्या या रस्त्यावर अनेक अडथळे निर्माण झाले असुन परिणामी दररोज छोटे मोठे अपघात होतात व तासंनतास वाहतुकीची कोंडी होत असल्याने आप आपसांत शाब्दिक चकमकी होण्याचे प्रमाण दररोज वाढत आहे.

- Advertisement -

या रस्त्याचे काम धिम्या गतीने व गुणवत्तापुर्वक दिसत नाही. सदरच्या रस्त्याचे काम गतीने पुर्ण करुन येथील दररोज निर्माण होणारा वाहतुक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडवावा अन्यथा या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रदिप बनसोडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.

रिपाइंचेे युवक जिल्हाध्यक्ष प्रदिप बनसोडे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, साकुरी गावातून नांदुर्खीकडे जाणार्‍या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. गेली अनेक महिन्यांपासून हे काम सुरु असुन कामात गती नसल्याने नागरीकांना तसेच वाहन चालकांना दररोज वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी यांना पायी अथवा सायकल, दुचाकी यावर चालणे जीवावर बेतणारे ठरत आहे. तर वाहतुक कोंडीत स्कुल बसेस तासंतास अडकुन राहत असल्याने मुलांचे शालेय नुकसान होत आहे.

पादचार्‍यांना या रस्त्यावरुन चालणे मुश्किलीचे बनले आहे. त्याचप्रमाणे सदरच्या रस्त्याचे काम करत असतांना वाहतुक सुरळीत राहील, असा पर्यायी रस्ता ठेवणे गरजेचे आहे. परंतू त्याबाबत संबंधीत कंपनीने विचार केलेला दिसत नाही. रस्त्याचे काम सुरु असुन धिम्या गतीने असल्याने कामाला विलंब होत आहे. त्याचा फटका नागरीकांना बसत आहे. रस्त्याच्या बाजूने जातांना चारी तसेच खड्डयात अनेक चार चाकी वाहने फसतात. त्यावेळी तासंतास वाहतुकीची कोंडी होवून वादात रुपांतर होण्याचे प्रसंग घडतात.

तसेच रस्त्यालगत वीज वाहक तारा असल्याने या तारांना मोठ्या चारचाकी वाहनाने स्पर्श होवून शॉर्टसर्कीट अथवा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या गुणवत्ता व दर्जाबाबतही अनेक नागरीक खाजगीत संशय व्यक्त करीत आहेत. प्रशासनाने संबंधीत कंपनीला योग्य त्या सुचना देवून रस्त्याचे काम दर्जेदार व तातडीने पुर्ण करावे अन्यथा लोकशाही व सनदशिर मार्गाने आंदोलन उभारु. वेळप्रसंगी रास्तारोकोही करु असा इशारा रिपाइं युवकचे जिल्हाध्यक्ष प्रदिप बनसोडे यांनी या पत्रकाद्वारे दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या