Saturday, April 27, 2024
Homeधुळेजुगार अड्यावर छापा, रोख रक्कमेसह तीन दुचाकी जप्त

जुगार अड्यावर छापा, रोख रक्कमेसह तीन दुचाकी जप्त

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील वडजाई रोडजवळ जुगार खेळणार्‍यांवर मोहाडी पोलिसांनी काल सायंकाळी कारवाई केली. पाच …

- Advertisement -

जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य व तीन दुचाकी असा एकुण 70 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक संगिता राऊत यांच्यासह पथकाने काल दि. 7 रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वडजाई रोडजवळ झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍यांवर छापा टाकला.

तेथून पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व तीन दुचाकी असा एकुण 70 हजार 640 रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोकाँ अजय दाभाडे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सपोनि संगिता राऊत यांच्यासह पथकातील पोहेकाँ प्रभाकर ब्राम्हणे, पोकाँ कांतीलाल शिरसाट, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, अजय दाभाडे, गणेश भामरे, धिरज गवते यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या