Friday, April 26, 2024
Homeधुळेबनावट आधारवर निराधार योजनेचे कार्ड तयार करणार्‍या केंद्रावर छापा

बनावट आधारवर निराधार योजनेचे कार्ड तयार करणार्‍या केंद्रावर छापा

साक्री – Sakri – प्रतिनिधी :

बनावट आधार कार्डच्या सहाय्याने इंदिरा गांधी योजनेत पात्र होण्यासाठीचे प्रकरण तयार करून देणार्‍या…

- Advertisement -

येथील शेतकी संघातील शॉपींगमध्ये असलेल्या अमर सीएसएससी या केंद्रावर तहसीलदार प्रविण चव्हाणके यांनी कारवाई केली. संपूर्ण दस्तऐवज जप्त करून शॉपींगला सील करण्यात आले आहे.

साक्री तालुक्यातील कासारे येथील लुकमान पिंजारी यांनी इंदिरा गांधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अमर सीएसएससी केंद्रामार्फत ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर केला होता.

त्यात वयाचा पुरावा म्हणून आधार कार्डवर जन्म तारिख 1 जानेवारी 1949 अशी नमूद होती. मात्र त्यांच्या मुळ आधार कार्डवर तारीख ही 1 जानेवारी 1973 अशी आढळून आली. यावरून आधार कार्ड हे ऑनलाईन प्रणालीद्वारे बनावट तयार करून सीएसएससी केंद्र प्रणालीमध्ये सामील केले होते.

सीएसएससी केद्र, सेतू केद्र, महाऑनलाईन सेवा केंद्रावर एजंटच्या सहाय्याने बनावट दाखले तयार करून अनेक प्रकरणे तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार विभागात मंजूर करण्यासाठी राजकीय, सामाजिक एजंटचा गराडा पडलेला दिसून येतो. लाभार्थ्यांकडून जास्तीची रक्कम घेऊन प्रकरण तातडीने मंजूर करण्यासाठी अधिकार्‍यांना हाताशी धरून बोगस प्रकरणे मंजूर करून घेत अनेक जण आजही योजनांचा लाभ घेत आहेत. अशा प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

बनावट आधार कार्ड सादर करून बनावट वयाचा पुरावा निर्माण केल्याप्रकरणी अमर सीएसएससी केंद्रावर जात तहसिलदार प्रविण चव्हाणके, नायब तहसिलदार डॉ.ए.बी.असटकर यांनी ही कारवाई केली आहे.

संजय गांधी, इंदिरा गांधी, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनांंच्या प्रकरणांची चौकशी करून बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात यावी. राजकीय पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, एजंटच्या माध्यमातून अनेक बोगस प्रकरणे मंजूर करून लाभ घेणार्‍या लाभार्थ्यांच्या प्रकरणांची चौकशी केल्यास अनेक बनावट आधार कार्ड आणि जन्म तारखेत बदल करून लाभ घेणार्‍या वयात न बसणार्‍यांचे प्रकरणे उघडकीस येवु शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या