Thursday, May 2, 2024
Homeधुळेआधी दप्तर हलवा, मगच आम्ही उपोषण सोडू !

आधी दप्तर हलवा, मगच आम्ही उपोषण सोडू !

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

साक्री तालुक्यातील बुरुडखे ग्रामपंचायतीचे कामकाज नजीकच्या पिंजारझाडी या छोट्याशा पाड्यातून चालते, ही बाब बुरुडखेतील आदिवासी

- Advertisement -

ग्रामस्थांना मान्य नाही. त्यामुळे दप्तर आपल्या गावात हलविण्यात यावे, या मागणीसाठी आज त्यांनी जेलरोडवर ठिय्या मांडला.

केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हक्कांपासून आदिवासी वंचित राहत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

एकलव्य आदिवासी क्रांतीदल संघटनेच्या वतीने आज सकाळी 11 वाजेपासून बुरुडखे गावातील शेकडो आदिवासी महिला, पुरुषांनी जेलरोडवर ठिय्या मांडला आहे.

प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी केला असून कितीही दिवसी उपोषणास बसण्याची तयारी दर्शविली आहे.

साक्री तालुक्यातील बुरुडखे ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. या गावाची लोकसंख्या जास्त असतांना देखील नजीकच्या पिंजारझाडी या छोट्याशा पाड्यातून ग्रा.पं.चे कामकाज चालते.

विशेष म्हणजे ग्रा.पं.साठी इमारत देखील पिंजारझाडीतच मंजूर झाली आहे. अनेक कामांसाठी बुरुडखेतील ग्रामसस्थांना त्रास सहन करावा लागतो आहे.

यामुळे ग्रामपंचायतीचे मुख्य दप्तर बुरुडखे गावात आणून इथूनच कारभार चालावा अशी गावकर्‍यांची जुनीच मागणी आहे.

यापुर्वी अनेकदा पत्रव्यवसहार करण्यात आला, आंदोलने झालीत, आश्वासने मिळाली परंतु प्रश्न अद्याप सुटलेली नाहीत.

अखेर आज संघटनेच्या जिल्हाध्यक्षा शिला वसावे यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांसमवेत शेकडो आदिवासी ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

अधिकार्‍यांचा लेचेपेचेपणा

सकाळपासून आंदोलन सुरु असतांना सायंकाळी याठिकाणी सहाय्यक गटविकास अधिकारी भारत धिवरे हे पोहचले. त्याचवेळी लोकसंग्रामचे युवानेते तेजस गोटे हेही आंदोलनस्थळी दाखल झाले.

मुख्यकार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढावा अशी विनंती सायंकाळ पासून करण्यात येत असतांना देखील रात्री 8 वाजेपर्यंत धिवरे यांनी वान्मती सी. यांच्याशी संपर्क साधला नव्हता. अखेर तेजस गोटे व सहकारी संतप्त झाले.

शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक नितीन देशमुख यांनीही घटनास्थळी दाखल होवून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अखेर उशिरा मुकाअ यांच्याशी संपर्क होवून साक्री गटविकास अधिकार्‍यांना तसे आदेश दिल्याचे सांगण्यात आले.

मात्र तोंडी आदेशाला न जुमानता दप्तर हलविल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. रात्री 9 वाजेपर्यंत हा घोळ सुरुच होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या