Saturday, May 11, 2024
Homeनगरसाकेगाव ग्रामपंचायतीला महिलांनी ठोकले कुलूप

साकेगाव ग्रामपंचायतीला महिलांनी ठोकले कुलूप

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

साकेगाव येथील अवैध दारुविक्रेत्याने दारू विक्री करू नये म्हणून दारू विक्रेत्याला जाब विचारणार्‍या महिलांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न सोमवारी (दि.5) झाला. संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.

- Advertisement -

तालुक्यातील साकेगाव येथे तीन जण अवैध दारू विक्री करतात. गावातील महीलांनी आक्रमक होत पंधरा दिवासांपूर्वी ग्रामसभा घेऊन दारू विक्री बंद करण्याची मगाणी केली होती. उत्पादनशुल्क विभागाच्या अहमदनगर येथील अधिकार्‍यांना व पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांना याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. महीला व ग्रामस्थांनी सांगुनही चितळी रस्त्यावरील एका टपरीत दारु विक्री सुरु होती. तेथे जवळच विद्यालय आहे. गावातील लोक दारु पिऊन विद्यार्थिनी व महिलांना त्रास देतात. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. सोमवारी महिलांनी याबाबत प्रथम ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना जाब विचारला.

दारूविक्री का बंद होत नाही. तुम्ही दारू बंद करणार नसाल तर आम्ही पुढे होतो असे म्हणुन ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर संतप्त महिला दारू विक्री करणार्‍या टपरीकडे गेल्या तेथे दारू विक्रेत्याला जाब विचारला असता दारू विक्रेत्याच्या बायकोने एका महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर सर्व महिला धावल्या परिस्थीतीचे गांभीर्य पाहून ग्रामस्थ व पोलीस कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. साकेगावचे ग्रामस्थ व महिलांनी पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांना सर्व हकीगत सांगितली.

तुम्ही तक्रार द्या मी दारू विक्रेत्याविरुद्ध कडक कारवाई करतो, असे चव्हाण यांनी ग्रामस्थांना सांगितले. यावेळी रुकसाना सिंकदर शेख, शिवगंगा वाघ, स्वाती दुधाळ, ज्योती दुधाळ, मनीषा दुधाळ, सुवर्णा तांबे, ज्योती तांबे, सविता तुपसौदर, कमल गोरे, आशा दुधाळ, मुक्ता गमे, केशर चन्ने, लता देवढे, माया बळीद, ताराबाई आमले, सुनीता सातपुते, अनिता सातपुते, सविता सातपुते, मंदा सातपुते, लता गायकवाड, रंजना पठारे, नवाबी शेख, राधा पठारे यांनी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना निवेदन दिले. यावेळी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या