Saturday, April 27, 2024
Homeनगरसाकतमध्ये नऊ हजार लीटर बायोडिझेल जप्त

साकतमध्ये नऊ हजार लीटर बायोडिझेल जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

साकत (ता. नगर) येथे अवैधरित्या बायोडिझेलची विक्री सुरू असताना पुरवठा विभागाने छापा टाकला. या कारवाईत सोळा लाख 82 हजार रुपयांचे बायोडिझेल, एक टँकर (एमएच 12 डीजे 6320) व एक ट्रक (एनटी 34 व्ही 7049) असा 16 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शरद मोहन ठुबे (रा. केडगाव, नगर), विकास बाळासाहेब रोमन (रा. लोहसर खाडगाव ता. पाथर्डी), दत्ता सुखदेव भालके (रा. लोंढेमळा, केडगाव), बालसुब्रमण्यम आरूमुगन (रा. तमिळनाडू) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पुरवठा निरीक्षक वैशाली शिकारे यांनी फिर्याद दिली आहे. साकत शिवारात अवैधरित्या बायोडिझेलची विक्री होत असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, पुरवठा निरीक्षक राजेंद्र राऊत, वैशाली शिकारे, अभिजित वांढेकर, महादेव कुंभार यांच्या पथकाने साकत शिवारात पंजाब नॅशनल ढाब्याशेजारी छापा टाकला.

त्यावेळी बायोडिझेलची विक्री होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथकाने टँकर, ट्रकसह बायोडिझेल असा साठा जप्त केला असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील संगमनेर, केडगावनंतर नगर तालुक्यात पुरवठा विभागाने बायोडिझेलचा साठा जप्त केल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बायोडिझेलची विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या