Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासंत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव 2023 : त्र्यंबकेश्वरमध्ये अवतरले वैकुंठ

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव 2023 : त्र्यंबकेश्वरमध्ये अवतरले वैकुंठ

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी (Saint Nivrutteenath Maharaj Yatrostav ) अडीच लाख वारकरी भाविक दाखल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही संख्या साडेतीन लाखाच्या आसपास जाईल असा अंदाज दिसतो.

- Advertisement -

साडेचारशे दिंड्या नगरीत दाखल झाल्याचे समजते.बुधवारी पहाटे श्री संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीची एकादशी पर्व काळावर महापूजा होणार आहे. तर दुपारी संत निवृत्तीनाथांचा रथोत्सव सोहळा होईल.राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत भागवत धर्माचा पताका हाती घेत येथे वारकरी दाखल झालेले आहेत. त्रंबक नगरीच्या मानाने जागा खूपच अपुरी पडल्याने ब्रह्मगिरी, गंगाद्वार, नील पर्वत,पेगलवाडी या ठिकाणी दिंड्या विसावल्या. वारकर्‍यांच्या दिंड्या फड लागले आहेत.

सकळही तीर्थे निवृत्तीचे ठायी

तेथे बुडी देई माझ्या मना

याची प्रचिती क्षणोक्षणी येत असून वारकर्‍यांच्या मांदियाळीने नगरीत वैकुंठ अवतरले आहे. गणपत बारी, पहिने बारी या भागातही दिंड्या दिसल्या आहेत.पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी असते अशा परिस्थितीत वारकरी तळ ठोकून आहेत.

संत निवृत्तीनाथ मंदिरातील दर्शनाची रांग आज चक्क पर्यटन केंद्रापर्यंत पोहोचली होती.गावात जिकडे तिकडे गर्दीचे चित्र पाहायला मिळाले.यात्रेकरू भाविकांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने कंबर कसली असून जोडीला पोलीस यंत्रणा संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्ट उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य सेवा आदी कार्यरत आहे.

एस टी महामंडळाने ज्यादा बसेसची सेवा मोठ्या प्रमाणावर दिली आहे. खाजगी वाहनांसाठी पार्किंग प्लेस निश्चित करण्यात आलेले आहे. कुठेही भाविकांच्या सेवेत आणि नियोजनात उणीव नको यासाठी नियंत्रण कक्ष पालिकेने उभारला आहे.महसूलसह सर्व शासकीय यंत्रणा समन्वय साधून आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मुख्य शासकीय महापूजेचे नियोजन आहे. बुधवारी पहाटे चार वाजता महापूजा होईल.नगरपालिकेने हेल्पलाइन नंबर जारी केले आहे. निर्मळवारीसाठी, तसेच अतिक्रमण,रस्ते मोकळे करण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या