Friday, April 26, 2024
Homeनगरनेवासा : माऊलींचे मंदिर दिव्यांनी उजाळले

नेवासा : माऊलींचे मंदिर दिव्यांनी उजाळले

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधीच्या निमित्ताने माऊलींची कर्मभूमीव ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये गुरुवारी दि.२ डिसेंबर रोजी सायंकाळी दीपोत्सव करण्यात आला. या दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे प्रवेशद्वार दिव्यांनी उजळून निघाले होते.

- Advertisement -

तर ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषाने परिसर दूमदुमला होता. गुरूवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या दीपोत्सवाप्रसंगी “पैस” खांबाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर वारकऱ्यांच्या हस्ते पैस खांबासमोर पहिला दीप लावण्यात येऊन संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींना अभिवादन करण्यात आले.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, हभप बाळकृष्ण महाराज सुडके, गहिनीनाथ आढाव, मंदिर विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, रामभाऊ जगताप, कृष्णा पिसोटे, भैय्या कावरे, डॉ. करण घुले यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भजने गाऊन व माऊलींच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या