Thursday, April 25, 2024
Homeनगरसाईकृपा फेज-2 ला गाळप परवाना देऊ नका

साईकृपा फेज-2 ला गाळप परवाना देऊ नका

माहेगाव |वार्ताहर| Mahegav

शेतकर्‍यांची एफआरपी थकविणार्‍या साईकृपा फेज 2 कारखान्यास ऊस गाळप परवाना देऊ नये,

- Advertisement -

या मागणीचे निवेदन राहुरी तालुका शेतकरी संघटनेने साखर सहसंचालक, अहमदनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

निवेदनात म्हटले, साईकृपा साखर कारखान्याने सन 2018-19 ते 2020 मध्ये गाळप केलेल्या उसाचे बील एफआरपीप्रमाणे शेतकर्‍यांना अद्याप दिलेले नाही. याबाबत शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी व साखर कारखाना प्रशासनाला अनेक वेळा लेखी व तोंडी मागणी करून देखील अद्याप दिलेली नाही.

शासनाच्या नियमानुसार शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम 15 दिवसांत देणे बंधनकारक असतानाही कारखान्याने सर्व नियम झुगारून शेतकर्‍यांची थट्टा केली आहे. थकीत रकमेला 15 टक्के दराने व्याजासह रक्कम मिळावी, त्या शिवाय गाळपास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.

परवानगी दिल्यास राहुरी तालुक्यातील सर्व थकीत शेतकर्‍यांसह शेतकरी संघटना कारखान्याच्या गव्हाणीत बसून आंदोलन करतील, असा इशारा अध्यक्ष नारायण टेकाळे, बी. के. टेकाळे, के. बी. टेकाळे, हरिभाऊ जाधव, बाळासाहेब लोखंडे, काशिनाथ टेकाळे, देवराम जाधव, सुभाष शिंदे, विजय जाधव, भाऊसाहेब जाधव यांनी दिला आहे.

कारखान्याने संपूर्ण थकित एफआरपी दिल्याशिवाय गाळप परवाना देऊ नये, असे आमच्या कार्यालयाने साखर आयुक्त पुणे यांना कळविले आहे. तरी नियोजित आंदोलन करु नये.

– भालेराव, प्रादेशिक सहसंचालक, अहमदनगर.

- Advertisment -

ताज्या बातम्या