Friday, April 26, 2024
Homeमनोरंजन'NTR 30' मध्ये सैफ अली खानची एन्ट्री, खलनायकाची भूमिका साकारणार

‘NTR 30’ मध्ये सैफ अली खानची एन्ट्री, खलनायकाची भूमिका साकारणार

मुंबई | Mumbai

साऊथचा सुपरस्टार अभिनेता ज्युनिअर एनटीआरच्या (Junior NTR) चित्रपटांची सगळेच जण आतुरतेने वाट बघत असतात. त्याची सोशल मिडीयावर ही त्याच्या फॅन्सची जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. त्याचा गेल्या वर्षी येऊन गेलेल्या RRR चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ घातला होता. त्या चित्रपटाला फक्त भारतातीतलच नाही तर जगातील प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं होत. आता मात्र, त्याच्या नव्या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. त्याचा नवा चित्रपट एनटीआर ३० (NTR 30) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडच्या सर्व स्टार्सचीही एन्ट्री होत आहे. जान्हवी कपूरनंतर (Janhavi Kapoor) आता सैफ अली खानही (Saif Ali Khan) या चित्रपटाचा भाग असणार आहे.या चित्रपटात सैफची एंट्री होऊ शकते अशी बातमी आधीच आली होती, पण आज एका फोटोसह अधिकृतपणे सैफ अली खान चित्रपटात दिसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. एनटीआर आर्ट्सच्या ट्विटर अकाऊंटवर नुकतेच काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.या फोटोमध्ये ज्युनिअर एनटीआरसोबत अभिनेता सैफ अली खान दिसत आहे.

एनटीआर 30 या चित्रपटात सैफ आणि ज्युनिअर एनटीआर यांचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकत आहेत. एनटीआर 30 या चित्रपटात सैफ अली खान हा खलनायकाची भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे.

एनटीआर 30 या चित्रपटातील सैफ अली खानच्या भूमिकेबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच या चित्रपटाची रिलीज डेट देखील अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

एनटीआर 30 या चित्रपटातील सैफ अली खानच्या भूमिकेबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच या चित्रपटाची रिलीज डेट देखील अजून जाहीर करण्यात आलेली नाही. सैफ अली खान शेवटचा ऋतिक रोशनसोबत ‘विक्रम वेधा’ चित्रपटात दिसला होता.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवली नाही. सैफ हा बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. आता ‘NTR 30’ द्वारे तो साउथ सिनेमात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या