Thursday, April 25, 2024
Homeनगरसाईबाबा सुपर स्पेशालिटी व श्रीसाईनाथ रुग्णालयात लवकरात लवकर भरतीप्रक्रिया करणार- ना. काळे

साईबाबा सुपर स्पेशालिटी व श्रीसाईनाथ रुग्णालयात लवकरात लवकर भरतीप्रक्रिया करणार- ना. काळे

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या शिर्डी येथील श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी तसेच श्रीसाईनाथ रुग्णालयात आरएमओ आणि सीएमओ पदांची संख्या कमी असून यासंदर्भात वृत्तपत्रात जाहिरात देऊन लवकरात लवकर भरती प्रक्रिया करणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

- Advertisement -

शिर्डी नगरपंचायतचे नगरपरिषद करण्यासाठी साईसंस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांचा खारीचा वाटा असल्याने काल शुक्रवार दि.18 रोजी दुपारी शिर्डी शहरात सर्वपक्षीय ग्रामस्थांच्यावतीने ना. काळे यांचे जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश गोंदकर, निलेश कोते, सुधाकर शिंदे, दादासाहेब गोंदकर, प्रमोद गोंदकर, दत्तात्रय गोविंद कोते, काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक कोते, राजेंद्र कोते, हरिश्चंद्र कोते, विकास गोंदकर, दत्तात्रय कोते, आप्पासाहेब कोते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष राकेश कोते, तानाजी गोंदकर, नितीन अशोक कोते, समीर शेख, सुरज शेळके, समीर सैय्यद साई कोतकर,प्रशांत कोते, शुभम भोसले आदी शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ना. काळे म्हणाले, साईसंस्थानच्या रुग्णालयात आरएमओ तसेच सीएमओची रिक्त पदे असून याबाबत तातडीने वृतपत्रात जाहिरात देऊन सदरील पदे भरणार आहे. तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.अभिजित देशमुख यांच्याकडे मागणी करणार आहोत की साई संस्थानला ब्रँंडेड डॉक्टर्स मिळावेत जेणेकरून वर्षानुवर्षे असलेली अडचण राहणार नाही. त्याचप्रमाणे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मेडिकल कॉलेज संदर्भात विश्वस्त मंडळाकडून पाठपुरावा सुरू असून लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेडिकल कॉलेजसाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. परंतु लवकरात लवकर सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नामदार काळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या