Friday, April 26, 2024
Homeनगरशनिवार रविवार साई मंदिर बंद ही अफवा - बानायत

शनिवार रविवार साई मंदिर बंद ही अफवा – बानायत

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी येथील जागतिक किर्तीचे तीर्थक्षेत्र असलेले साईबाबांचे मंदिर शनिवार व रविवार रोजी बंद असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत असून मंदिर बंद बाबतचे अद्यापपर्यंत कुठलेही आदेश शासन स्तरावरून निर्गमित झालेले नाही. त्यामुळे अशा अफवांवर भाविकांनी विश्वास ठेवू नये.

- Advertisement -

शासनाकडून यासंदर्भातील आदेश प्राप्त झाल्यास याबाबत साईबाबा संस्थान मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या माहितीस्तव तशी माहिती जारी केली जाईल, अशी माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. शिर्डी येथील साईमंदीर शनिवार व रविवार बंद असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाविकांमध्ये दर्शनासाठी संभ्रम निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाग्यश्री बानाईत यांनी याबाबत व्हिडीओ क्लिप पाठवली असून त्यात वरील खुलासा त्यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या