साईसंस्थान स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण : संस्थानला शताब्दी वर्षाचा विसर ?

jalgaon-digital
4 Min Read

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

विश्वाला श्रद्धा सबुरीचा मंत्र देणार्‍या शिर्डीतील (Shirdi) साईबाबांंच्या साईसंस्थान स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण (Sai Baba’s Sai Sansthan is one hundred years old) होत असून साईसंस्थान शताब्दी (Sai Sansthan Shatabdi) वर्षाचा संस्थानला विसर पडला आहे का ? एकीकडे 13 फेब्रुवारी 1922 रोजी साईसंस्थानची स्थापना झाली त्यावेळी एकूण 15 विश्वस्त नियुक्त करण्यात आले होते तर दुसरीकडे शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर विश्वस्त मंडळाचा तिढा न्यायालयात वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी वतीने 31जुलै पर्यंत विश्वस्त मंडळ (Board of Trustees) नियुक्त करण्यात येईल असे सांगितले असले तरी विश्वस्त मंडळात आता शिर्डी (Shirdi) शहरातील ग्रामस्थांना प्राधान्य द्यावे यासाठी शिर्डी ग्रामस्थांच्यावतीने उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे. त्यामुळे शिर्डी तसेच परिसरातील कामधेनू असलेल्या संस्थानवर लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नियुक्ती करावी आणी संस्थान शताब्दी महोत्सव साजरा करावा, अशी मागणी (Sai Sansthan Shatabdi Celebration Demand) ग्रामस्थ व साईभक्तांनी केली आहे.

साईसमाधी शताब्दी वर्षात शासनाने शिर्डीच्या विकासासाठी 3 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यामध्ये संस्थानने नियोजित केलेले भक्ताभिमुख विविध सोयीसुविधा त्याचप्रमाणे प्रकल्प सुरू होणार होते. मात्र शासनाकडून मंजूर निधी तर दुरच राहिला उलट संस्थानच्या तिजोरीत हात घालून काकडी विमानतळ व निळवंडेसाठी पैसे द्यावे लागले. अपेक्षेप्रमाणे शताब्दी महोत्सव साजरा झाला नसल्याचे साईभक्तांनी बोलून दाखवले. आता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात संस्थान स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहे.

दरम्यान उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेमुळे पुन्हा संस्थान विश्वस्त मंडळ न्यायालयाच्या वादात सापडले तर संस्थान शताब्दी वर्ष महोत्सव साजरा न करताच असेच निघून जाईल. साईसंस्थान स्थापनेवेळी एकूण 15 सदस्य विश्वस्त मंडळात होते. तर भक्तमंडळात 232 सदस्यांचा समावेश होता. संस्थानकडे स्थापनेवेळी केवळ 2 हजार 238 रुपये होते. मात्र शंभर वर्षात आता 2 हजार 200 कोटींहून अधिक ठेवी असून 450 किलो सोने, साडेपाच हजार किलो चांदी तर 10 कोटींचे मौल्यवान हिरे एवढी संपत्ती आहे. असे असताना देशात नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थान स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत असताना शताब्दी वर्षाचा विसर ही दुर्दैवाची बाब आहे.

साईसमाधी शताब्दी वर्षानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त केल्याने संस्थानचा कारभार त्रिसदस्यीय तदर्थ समितीकडे असून समितीत नियुक्त करण्यात आलेले सदस्य कामकाज पहात आहे. साई संस्थानची स्थापना दासगणू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पाच आजीव सदस्यांसह पंधरा जणांची कमिटी स्थापन करण्यात आली. श्री साईबाबांची खरी महती ही मनोजकुमार यांनी 1977 साली निर्माण केलेल्या शिर्डी के साईबाबा या चित्रपटामुळे सात समुद्रापलीकडे जाऊन पोहचली आणि हाच चित्रपट साईबाबांच्या भाविकांसाठी मैलाचा दगड ठरला आहे.

शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिर आज सुवर्ण मंदिर म्हणून ओळखले जात आहे. साईसंस्थान विश्वस्त मंडळामध्ये आज रोजी अनेक फेरबदल झाले असून राज्यशासनाच्या अखत्यारीत संस्थानचा कारभार गेल्याने येथे पंधरा वर्षांपासून राजकीय सदस्यांची वर्णी मंडळात लागताना दिसत आहे मात्र राजकारणाच्या ह्या व्यस्त कारभारात संस्थान स्थापना शताब्दी वर्षाचा आजतरी प्रत्येकाला विसर पडला असल्याने लाखो भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आज रोजी साईबाबा संस्थानने भाविकांच्या देणगीतून जमा झालेल्या रकमेतून परिसरात आणि राज्यात अनेक विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. परंतु ज्या संस्थानने देशात नंबर दोनचे श्रीमंत संस्थान म्हणून ख्याती प्राप्त केली त्याच साईसंस्थान प्रशासनाला साईसंस्थान स्थापनेच्या शताब्दी वर्षाचा विसर का पडावा ? हा प्रश्न यानिमित्ताने अनुत्तरित आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *