Thursday, April 25, 2024
Homeनगरसाईनाथ रुग्णालयात नविन अद्ययावत 10 बेडचे अतिदक्षता कक्ष सुरु

साईनाथ रुग्णालयात नविन अद्ययावत 10 बेडचे अतिदक्षता कक्ष सुरु

शिर्डी |प्रतिनिधी|Shirdi

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या श्री साईनाथ रुग्णालयाचे तिसर्‍या मजल्याचे काम पुर्ण झाले असून या ठिकाणी उभारण्यात आलेल्या

- Advertisement -

अतिदक्षता कक्षाकरीता मुंबई येथील देणगीदार साईभक्त हरेश उत्तमचंदानी यांनी 1 कोटी 43 लाख 98 हजार 164 रुपयांचे विविध साहित्य देणगी स्वरुपात दिले. या नविन अद्ययावत अतिदक्षता कक्षाचे हस्तांतर व शुभारंभ संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, देणगीदार साईभक्त डॉ. जयकिशन मोरदानी, भुषण शहा, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, दिलीप उगले, श्री साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. मैथिली पितांबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पौरवाल, डॉ. कडू, डॉ. तांबे, परिचारक-परिचारीका व कर्मचारी उपस्थित होते.

श्री साईनाथ रुग्णालयात रुग्णांकरीता बेडची संख्या कमी पडत असल्यामुळे रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्याचे बांधकाम हाती घेण्यात आलेले होते. तसेच सन 2015 पासून या ठिकाणी जादा आयसीयु कक्ष उभारण्याचे काम प्रस्तावित होते व त्यास मान्यताही प्राप्त झालेली होती. आता रुग्णालय इमारतीच्या तिसर्‍या मजल्याचे काम पूर्ण झाले असून या रुग्णालयात एकुण 300 बेड उपलब्ध होणार आहे.

तसेच नविन अद्ययावत असे 10 बेडचे अतिदक्षता कक्षही उभारण्यात आलेले आहे. या अतिदक्षता कक्षाकरीता मुंबई येथील देणगीदार साईभक्त हरेश उत्तमचंदानी यांनी 1 कोटी 43 लाख 98 हजार 164 रुपये किंमतीचे बेड, व्हेंटीलेटर, मॉनिटर असे विविध साहित्य देणगी स्वरुपात दिले. तसेच या ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या वार्डकरिता पुणे येथील क्वॉलिसर्ज सर्जिकलच्या वतीने भुषण शहा यांनी 5 लाख 75 हजार रुपये किंमतीचे बेड, मॅटरेस, लॉकर आदी साहित्य देणगी स्वरुपात दिले.

यापुर्वी अतिदक्षता बेड कमी पडत असल्यामुळे बर्‍याच रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात पाठविणे भाग पडत होते. आता या नव्याने उभारण्यात आलेल्या सुविधामुळे जास्तीत-जास्त रुग्णांना फायदा होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या