Thursday, April 25, 2024
Homeनगरसाई भक्ताच्या गाडीची काच फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कमेची चोरी

साई भक्ताच्या गाडीची काच फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कमेची चोरी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबांच्या सत्संगाकरिता कुटुंबातील सदस्यांना बरोबर घेऊन आलेल्या साईभक्तांच्या गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी गाडीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 45 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शिर्डीत घडली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

विकास ज्ञानेश्वर राऊत रा. गोकुळनगर कात्रज पुणे हे पत्नी मुलांसह सह साई आश्रम शिर्डी एक हजार रुम या ठिकाणी मुक्कामी थांबले होते. 16 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास हे कुटुंब परतीच्या प्रवासास निघण्यासाठी त्यांच्या मालकीची असलेली बलेनो कार एम. एच. 12, क्यु. वाय. 1200 मध्ये सायंकाळी 7.30वाजता सर्व सामान व साहित्य ठेवून रुमची चावी देण्यासाठी ऑफिसमध्ये गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने काही वेळातच गाडीची काच फोडून गाडीचे नुकसान केले व गाडीत ठेवलेल्या पर्सची व बॅगेची उचकापाचक करून त्यात ठेवलेले पंधरा हजार रुपये रोख, पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र व पंधरा हजार रुपयांचे सोन्याचे पेडल असा 45 हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज व रोख रक्कम चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार विकास राऊत यांनी शिर्डी पोलिसांत दिल्यामुळे शिर्डी पोलिसांनी तात्काळ अज्ञात चोरट्याच्या विरोधात भादंवी कलम 379, 427 अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या