Saturday, April 27, 2024
Homeनगरसाईबाबा संस्थानच्या 'ड्रेस कोड'च्या फलकाला काळे फासले

साईबाबा संस्थानच्या ‘ड्रेस कोड’च्या फलकाला काळे फासले

शिर्डी | प्रतिनिधी

मागील महिन्यात साईबाबा मंदिर संस्थानने मंदिर परिसरात फलक लावून भक्तांना सूचना केली होती की, दर्शन घेण्यासाठी भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा करावी. दरम्यान या फलकाला भुमाता ब्रिगेडच्या दोन महिला व एका पुरूषाने काळे फासले आहे. या प्रकरणी तिघांनाही शिर्डी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

मागील महिन्यात भारतीय वेशभुषेतच साई मंदिरात प्रवेश करावा तसे फलक साई संस्थानने लावल्या नंतर भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी १० डिसेंबर रोजी सदर फलक ३१ डिसेंबर पर्यंत हटवन्याचा इशारा दिला होता. यावरून शिर्डीत मोठे वादंग पेटले होते. शिवसेना महिला आघाडी, ब्राम्हण महासंघ, मनसे व शिर्डीतील महिलांनी तृप्ती देसाई यांना शिर्डीत पाय ठेवू न देन्याचा इशारा दिला होता. याला आव्हान देत तृप्ती देसाई ३१ डिसेंबरला शिर्डीकडे येत असताना त्यांना सुप्याजवळ पोलीसांनी अडवले व पुन्हा पुण्याकडे पाठवून दिले होते.

आज गुरूवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास दोन महिला व एका पुरूषाने गेट नंबर एक समोरील फलकावर काळा पदार्थ फेकला. यावेळी साई संस्थांनच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडविले व शिर्डी पोलीसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी मिनाक्षी शिंदे (सांगली), मनिषा पुंजे (पुणे) व हर्षल पाटील यास ताब्यात घेतले असून हर्षल पाटील याने स्वताला भुमाता ब्रिगेडचा पदाधीकारी असल्याचे सांगीतले. या प्रकरणी साईबाबा संस्थांनच्या वतीने शिर्डी पोलीसांत तक्रार दाखल करन्याचे काम आहे. साई संस्थानच्या वतीने फलकावर टाकलेले काळे पुसून फलक पुर्ववत केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या