Saturday, April 27, 2024
Homeनगरदिवाळीनिमित्त साईबाबा समाधी मंदिर व परिसरात सर्वत्र फुलांची आकर्षक सजावट

दिवाळीनिमित्त साईबाबा समाधी मंदिर व परिसरात सर्वत्र फुलांची आकर्षक सजावट

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

यावर्षी दिवाळीनिमित्त शिर्डी येथील साईबाबा समाधीमंदिरात साईबाबांच्या आशिर्वादाने कोते पाटील परिवार व साई निर्माण उद्योग समूहाच्यावतीने साईबाबांच्या समाधी मंदिर, द्वारकामाई, गुरूस्थान, चावडी, गणपती मंदिर, शनीमंदिर, महादेवमंदिर, दत्तमंदिर, मारूतीमंदिर तसेच चार नंबर गेट ते द्वारकामाई बाहेरील बाजूस आकर्षक व सुंदर अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांपासून साईबाबांच्या दर्शनासाठी व आशिर्वादासाठी समस्त शिर्डी ग्रामस्थ व जगभरातील साईभक्त आसुसलेले असताना बाबांच्या कृपाआशिर्वादाने मंदिर सुरू झाले व सर्व साईभक्त दर्शनासाठी शिर्डीत गर्दी करू लागले, गेल्या वर्षीची दिवाळी साईभक्तांनी व ग्रामस्थांनी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन साध्या पध्दतीने साजरी केली मात्र यंदाची दिवाळी सर्वच साईभक्त साईबाबांच्या शिर्डीत येऊन साजरी करत आहेत. याचा सर्व शिर्डीकरांना व साईभक्तांना आनंद असून हा आनंद द्विगुणीत व्हावा म्हणून दिवाळीनिमित्त साईबाबांच्या आशिर्वादाने कोते पाटील परिवार व साई निर्माण उद्योग समूहाच्यावतीने साईबाबांच्या समाधी मंदिर, द्वारकामाई, गुरूस्थान, चावडी, गणपती मंदिर, शनीमंदिर, महादेवमंदिर, दत्तमंदिर, मारूतीमंदिर तसेच चार नंबर गेट ते द्वारकामाई बाहेरील बाजूस आकर्षक व सुंदर अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईसंस्थानच्या साईमंदिरात दीपावलीनिमीत्त आकर्षक फुलांची सजावट साईनिर्माण उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांच्या वतीने करण्यात आली आहे. साईमंदिर तसेच मंदिर परिसरात सजावट करण्यात आलेल्या सुंदर फुलांमध्ये कार्नेशन, मधुकामिनी, कटफ्लॅावर, शेवंती, अस्तर, झेंडू, डजरोज, जलबेरा, जायसळा,सनाफ इंडिया, टिस्कॅान अशा विविध फुलांच्या प्रजाती वापरून तसेच डेकोरेटिव्ह मेटेरिअलचा वापर केला आहे. यासाठी साधारणपणे तीन लाख रुपये खर्च आला असून 5 टन फुले लागली आहेत. ही सर्व फुले नागपूर, बेंगलौर, पुणे, मुंबई, चांदवड, वैजापूर, कन्नड, नगर येथून उपलब्ध करण्यात आली असल्याचे शिर्डी येथील द्वारकामाई फ्लॅावर्स डेकोरेटर्स राजू उईके यांनी सांगितले. त्यांच्या 19 सदस्यांसह बुधवार सकाळी सजावटीसाठी सुरुवात करण्यात आली तर रात्री 10 वाजेपर्यंत पूर्ण केली. यावेळी विजय कोते यांनी राजू उईके व त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या