Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्या‘स्टाईस’वर सहकार उद्योग विकास आघाडी पॅनलची सत्ता

‘स्टाईस’वर सहकार उद्योग विकास आघाडी पॅनलची सत्ता

सिन्नर। विलास पाटील Sinnar

सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत ( STICE Election) माजी आमदार राजाभाऊ वाजे समर्थक, माजी संचालक नामकर्ण आवारे (Former Director Namkarna Aware) यांच्या नेतृत्वाखालील सहकार उद्योग विकास आघाडीने (Sahkar Udyog Aaghadi panel)8 जागा जिंकत संस्थेवर सलग दुसर्‍यादा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर आमदार माणिकराव कोकाटे समर्थक माजी चेअरमन अविनाश तांबे, पंडित लोंढे, सुधा माळोदे, बाबासाहेब दळवी यांच्या नेतृत्वाखालील उद्योजक विकास पॅनलला 4 जागा मिळाल्या तर माजी चेअरमन दिलीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्टाईस बचाव पॅनलला भोपळाही फोडता आला नाही.

- Advertisement -

कारखानदार मतदारसंघात नामकर्ण यशवंत आवारे (177), सुनील दादाजी कुंदे (170), अविनाश एकनाथ तांबे (138), अरुण किसनराव चव्हाणके (132, अतुल शिवदयाल अग्रवाल (122), बाबासाहेब कारभारी दळवी (119), प्रमोद मोतीराम महाजन (117) हे विजयी झाले आहेत. तर कैलास रंगनाथ वाघचौरे (104), दिलीप रामराव शिंदे (103), सुनील गंगाधर जोंधळे (95) माधव बाबुराव घोटेकर (94), श्रीहरी अरुण नावंदर (89), किशोर सुरेश देशमुख (75), संजय संपतराव शिंदे (74), चंद्रभान केशव हासे (73), कैलास भीमराज हंडोरे (72), महेंद्र मुरलीधरसा क्षत्रिय (72), विजय भाऊराव सपकाळ (48), सुधीर नारायण साळवेकर (43), अविनाश बाबुराव ढोपळे (40), चंद्रशेखर परसराम गुंजाळ (44) यांना पराभवाचा सामना करावा लागला. या गटात 11 मतपत्रिका अवैध ठरवण्यात आल्या.

महिला प्रतिनिधी मतदारसंघात सुधा विजय माळोदे-गडाख (172) व सिंधू नामकरण आवारे (124) या विजयी झाल्या. अलका विठ्ठल जपे (99) सुनंदा वामन मुटकुळे (124), मीरा अरुण डावखर (55), विजया बंडू पगार (45) यांचा पराभव झाला. या गटात 6 मतपत्रिका बाद झाल्या. भटक्या विमुक्त जाती गटात रामदास बबन डापसे (123) यांनी रामदास भास्कर दराडे (118) यांचा पाच मतांनी पराभव केला. तर करणसिंग नारायण पाटील यांना फक्त 59 मते मिळाली.

या मतदार संघात 6 मतपत्रिका बाद झाल्या. इतर मागासवर्गीय मतदारसंघात माजी चेअरमन पंडित विठ्ठल लोंढे (130) यांनी माजी संचालक प्रभाकर दिगंबर बडगुजर (125) यांचा 5 मतांनी पराभव केला. सुरज प्रल्हादराव देशमुख यांना केवळ 44 मते मिळाली. या मतदारसंघात 7 मतपत्रिका बाद ठरल्या. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात संदीप चिंतामण पगारे (149) यांनी मधुकर लहुजी जगताप (85) व सुधीर गंगाधर वाकचौरे (75) यांचा पराभव केला. या मतदारसंघात 7 मतपत्रिका बाद ठरल्या.

नेतृत्वावर शिक्कामोर्तब

कारखानदार गटातून नामकर्ण आवारे व सिंधू आवारे हे पती-पत्नी विजयी झाले आहेत. उद्योजक विकास पॅनलचे अविनाश तांबे, बाबासाहेब दळवी, पंडीत लोंढे, सुधा माळोदे-गडाख हे चार नेतेच विजयी झाले. सुधा माळोदे या वसाहतीचे संस्थापक चेअरमन स्व. सुर्यभान गडाख यांच्या कन्या आहेत. त्या संस्थेच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षा होत्या.

प्रशासकीय मंडळाचे उपाध्यक्ष नारायण पाटील निवडणुकीच्या रिंगणात नव्ंहते मात्र, त्यांचे पुत्र करणसिंग पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रशासकीय मंडळाचे तिसरे सदस्य संजय शिंदे हेही पराभूत झाले आहेत. नामकर्ण आवारे हे सर्वाधिक 177 मते मिळवून विजयी झाले. तर त्या खालोखाल 172 मते माळोदे यांना तर सुनिल कुंदे 170 मते मिळवून तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

माजी चेअरमन दिलीप शिंदे, माजी व्हा. चेअरमन रामदास दराडे, किशोर देशमुख, माजी संचालक चंद्रशेखर गुजाळ, माधव घोटेकर, विजय सपकाळ, मीरा डावखर, विजया पगार, प्रभाकर बडगुजर, मधुकर जगताप यांचा पुन्हा संस्थेत जाण्याचा प्रयत्न मतदारांनी हाणून पाडला आहे. दिलीप शिंदे यांच्या पॅनलमध्ये स्वत: शिंदे वगळता मतांची शंभरी गाठता आली नाही. भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल जपे यांच्या पत्नी अलका जपे यांना या निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. 5 वर्षापूर्वी स्वत: जपे यांचाही पराभव झाला होता. या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी पुन्हा एकदा आवारे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.

यावेळी सकाळपासूनच एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आदिवासी विकासचे उपनिबंधक किरण गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

वसाहतीच्या सभासदांनी सलग 5 निवडणूकांमध्ये आपली पाठराखण केली असून उद्योजक आजही आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे या निवडणूकीने दाखवून दिले आहे. सभासदांनी दिलेल्या या संधीचे आपण सोने करु व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचा वचननामा 100 टक्के राबवण्याचा यापुढील काळात प्रयत्न करणार आहे. उद्योजकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांच्या मी ऋणात राहू इच्छितो. उद्योजकांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्यासाठी मी व माझे सर्व सहकारी कटीबध्द आहोत.

नामकर्ण आवारे, नेते, सहकार उद्योग विकास आघाडी पॅनल (Namkarn Aaware, Leader, Sahkar Udyog Aaghadi panel)

- Advertisment -

ताज्या बातम्या