Saturday, April 27, 2024
HomeनाशिकLive साहित्य संमेलन : आनंदयात्रा रंगली सांस्कृतिक कार्यक्रमांनी

Live साहित्य संमेलन : आनंदयात्रा रंगली सांस्कृतिक कार्यक्रमांनी

आनंदयात्रा (एक सांस्कृतिक सोहळा )

लेखक : प्राजक्त देशमुख

- Advertisement -

दिग्दर्शक : सचिन शिंदे

दिग्दर्शक सहाय्य : विनोद राठोड

सहभाग : नाशिकचे 150 कलावंत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

‘दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला’ कवी गोविंदाग्रजांची poet Govindagraj कवने तसेच भारुडापासून ते अभंगांपर्यंत Bharuda to Abhanga ; कवी कुसुमाग्रजांपासून ते बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांपर्यंत; दादासाहेब फाळके ते राजीव पाटील यांचा प्रवास असा अवर्णनीय सोहळा कुसुमाग्रज नगरीत Kusumagraj Nagari आनंदयात्रा सोहळ्यात Aanandyatra Sohla बघायला मिळाला. या सोहळ्याला रसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील दिवंगत अश्या प्रातिनिधिक साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर आधारित कथा कविता नृत्य-नाट्य अशा माध्यमातून डोळ्याचे पारणे फेडणारा एक दिमाखदार सोहळा कलावंतांनी सादर केला. ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 94th Marathi Literary Convention विक्रमी अशा ३२१ कलावंतांनी सादर केलेला आनंदयात्रा या सांस्कृतिक सोहळ्याने रसिकांची माने जिंकली. प्राजक्त देशमुख लिखित, सचिन शिंदे व विनोद राठोड सहदिग्दर्शित हा सांस्कृतिक सोहळा म्हणजे नाशिकमध्ये प्रथमच तब्बल तीनशे एकवीस कलावंत एकत्र येऊन मोठी पर्वणीच यावेळी सादर केली.

या संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं होत. आनंदयात्राची यात्रा ही गाईड आणि पर्यटक यांच्या माध्यमातून दाखविण्यात आली. त्याचे निवेदन जयंत ठोंमरे, भूषण मटकरी, राजेंद्र उगले, अरुण इंगळे, भाग्यश्री पारनेरकर ,प्रिया जैन ,श्रद्धा पाटील प्रांजली सोनवणे यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात कवी गोविंद Poet Govind यांच्या नमने वाहुनि स्तवने उधळा ह्या नमनाने झाली. त्यानंतर साहित्याची दिंडी नाचत गाजत रंगमंचावर आली. नाशिकच्या खास गोष्टींची व्यक्त केली. भूषण मतकरी यांनी याचे सूत्रसंचालन करत नाशिकबद्दल माहिती दिली. बहिणाबाईंच्या माझी माय सरस्वती याबाबत त्यांनी माहिती दिली. या सोहळ्यात विशेष म्हणजे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील बहिणाबाई चौधरी, सोपानदेव चौधरी, लक्ष्मीबाई टिळक वि.दा.सावरकर, मुरलीधर खैरनार, वामनदादा कर्डक शाहीर परशराम, बी.डी. जाधव, वि.वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, बालकवी, ग.ह पाटील, साने गुरुजी,बा. सी. मर्ढेकर, कुसुमाग्रज, किशोर पाठक,अरुण काळे, आनंद जोर्वेकर अशा साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर तर चित्रपट विभागात दादासाहेब फाळके ते राजीव पाटील यांचा प्रवास चित्रफित आणि नृत्यातून दाखविण्यात आला तसेच लक्ष्मीबाई टिळक, बाबुराव बागुल यांच्या बद्दलची माहिती पण चित्रफितीद्वारे देण्यात आली.

नृत्य दिग्दर्शनात-आदिती पानसे, किर्ती भवाळकर, सुमुखी अथणी, प्रदीप गोराडे, ग्लोबल स्कूल -पूजा गायकवाडआदींचा सहभाग आहे. सर्व नाटक, कवितांचा ग्रुप, सर्व तांत्रिक बाजू सांभाळणारे तसेच रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा अपूर्वा शौचे, रंगमंच साह्य आदित्य समेळ, संगीत संयोजन मकरंद हिंगणे, आनंद ओक, ध्वनी संयोजन तेजस बिल्दिकर, रोहित सरोदे, चित्रफित संकलन लक्ष्मण कोकणे, प्रसिद्धी संकल्पना निलेश सूर्यवंशी, अभय ओझरकर व श्रीराम वाघमारे, यांचे सहकार्य लाभले तर मार्गदर्शक दत्ता पाटील, लेखन प्राजक्त देशमुख सह लेखन वेद दळवी यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन शिंदे, प्रकाशयोजना व सह दिग्दर्शन करणारे विनोद राठोड यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या