Saturday, April 27, 2024
Homeधुळेधुळ्यात शिवसेनेतर्फे आजपासून भगवा सप्ताहाचे आयोजन

धुळ्यात शिवसेनेतर्फे आजपासून भगवा सप्ताहाचे आयोजन

धुळे Dhule_। प्रतिनिधी

शिवसेनेतर्फे (Shiv Sena) पक्षप्रमुख (Party chief) तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसाचे (birthday) औचित्य साधून शिवसेना धुळे जिल्हातर्फे दि.27 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान भगवा सप्ताहाचे आयोजन (Organization of Saffron Week) करण्यात आले आहे.

- Advertisement -

दि.27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता ग.नं.6 मधील शिवनेरी चौक, 10.30 वाजता नेहरू नगरातील जगदंबा चौक येथे प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.सकाळी 11.30 वाजता साक्रीरोडवरील यमुनाई वाघ अपंग मतिमंद निवासी शाळा येथे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामीण मतदार संघातील कापडणे, देवभाने, फागणे, निमडाळे, नेर, निमखेडी, कौठळ आदी गावात सदस्य नोंदणी अभियान राबविले जाणार आहे.

शिवसेनेच्या जमनागिरीरोड विभागाच्या वतीने सदस्य नोंदणीसह वृक्षारोपण व कोरोना बुस्टर डोस शिबीराचे आयोजन केले आहे. सर्व कार्यक्रमांना सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, माजी आमदार प्रा.शरद पाटील, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, विधानसभा संघटक डॉ.सुशील महाजन, कैलास पाटील, बबन थोरात, पिंटू शिरसाठ, राजेश पटवारी, देविदास लोणारी, भुपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, चंद्रकांत गुरव, प्रफुल्ल पाटील, महिला आघाडीच्या हेमाताई हेमाडे, ज्योत्सना पाटील, जयश्री वानखेडे, नाना वाघ, धनराज पाटील, नितीन पाटील, अरूण धुमाळ, तुषार भामरे, मनिष जोशी, विश्वनाथ सोनवणे आदींची उपस्थिती राहील.

शहरातील कार्यक्रमांचे आयोजन सुनील पाटील, विनोद जगताप, पुरूषोत्तम जाधव, संदीप सूर्यवंशी, रवी माळी, रामदास कानकाटे, ललित माळी, कुणाल कानकाटे, संदीप चव्हाण, प्रविण साळवे, भटू गवळी, नंदु फुलपगारे, पंकज भारस्कर, आबा भडागे, विकास शिंगाडे, शेखर वाघ, शरद गोसावी, संदीप चौधरी, हाजी रफीक पठाण, एजाज हाजी आदींनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या