Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये दोन वर्षात साकारणार सफारी पार्क!

औरंगाबादमध्ये दोन वर्षात साकारणार सफारी पार्क!

औरंगाबाद – aurangabad

पर्यटकांचे (Tourist) आकर्षण ठरणारे आणि शान वाढवणारे सफारी पार्क (Safari Park) दोन वर्षांत उभारले जाणार आहे. या कामाचे चार टप्पे करण्यात आले असून. चारही टप्प्यातील कामे गनीने पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- Advertisement -

औरंगाबाद (Smart City Development Corporation) स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सफारी पार्कचे काम केले जात आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पालिकेचे प्रशासक आस्तिककृमार पांडेय यांच्या उपस्थित बैठक झाली. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, शहर अभियंता सखाराम पानझडे, सल्लागार ब्रिजराज शर्मा, डॉ. के. एम. सोनी, रोमल मेहता, पी. आर. मेहता, प्रेम बालानी, समीर जोशी, स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान उपस्थित होते. सफारी पार्कसाठी राज्य शासनाने शंभर एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेवर चार टप्प्यात कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण ४.२५ किलोमीटरच्या तीन संरक्षक भिंत बांधणे, जागाचे सपाटोकरण करणे, पाच प्रवेशद्वार उभारणे हो कामे केली जात आहेत. तीनपैकी दोन संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत. सफारी पार्क परिसरातील शेतकऱ्यांसाठी पर्यायी रस्ता तयार झाल्यावर तिसरी भिंत बांधली जाणार आहे, असे या बैठकीत सांगण्यात आले.

पाचपैकी एका प्रवेशद्वाराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात अंतर्गत रस्ते, सर्व्हिस रोड यांचा समावेश आहे. त्याच बरोबर पाणी, डनेज, विद्युत व्यवस्थेची कामे केली जाणार आहेत. कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा उभारण्याचे काम देखील केले जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात प्राण्यांसाठी ८४ पिंजरे बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. विविध प्रजातींच्या प्राण्यांचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन पिंजऱ्यांचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. प्रशासकीय इमारत, स्टोअर रुम, फूड कोर्ट, सफारी पार्क, स्वच्छतागृह आदींची कामेही तिसऱ्या टप्प्यात केली जाणार आहेत.

चौथ्या टप्प्यात जागेच्या उपलब्धतेनुसार कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, टायगर सफा हो कामे केलो जाणार आहेत. मार्च २०२४ पर्यंत सफारी पार्कचे काम पूर्ण करुन ते पर्यटकांसा

- Advertisment -

ताज्या बातम्या