Thursday, May 2, 2024
Homeजळगावमंदिर उघडावे यासाठी यावल-भुसावळ टी पॉईंटवर साधू संतांचे उपोषण

मंदिर उघडावे यासाठी यावल-भुसावळ टी पॉईंटवर साधू संतांचे उपोषण

यावल – प्रतिनिधी Yaval

महाराष्ट्रात सिनेमा हॉल रेस्टॉरंट बार देशी व विदेशी दारू बियर बार व सर्व राजनीति कार्यक्रम संपूर्ण उघडत आहे देव देवतांचे मंदिर बंद का? महाराष्ट्रात साधुसंतांच्या भगIव्या चा अवमान तीन तिघाडा सरकार वारंवार अवमान करत आहे, लवकरात लवकर मंदिर

- Advertisement -

उघडावी साधुसंत मंदिरातील साधु-संत व मंदिराबाहेर त्यांच्यावर उपासमारीची वेळ तीन तिघाडा सरकार करत आहे. महाराष्ट्रातील सर्व साधुसंतांना व भाविकांना आपल्या भगवान भगवा परमेश्वराची दर्शन घेण्यास तीन तिघाडा सरकार का थांबवित आहे?

यासाठी यावल-भुसावळ टी पॉईंटवर राम जन्मभूमी अयोध्या परिक्रमा वाशी मनोहर भिला पाटील व कोळवद येथील पंढरीनाथ नामदेव महाराज तसेच सोमा धनगर यांनी उपोषण केले उपोषण स्थळी यावल पोलीस स्टेशनचे पीआय अरुण धनवडे पोलीस कॉन्स्टेबल सुशील घुगे व भुषण चव्हाण होमगार्ड पंकज फिरके यांनी बंदोबस्त केला.

सकाळी साडेदहा वाजता या महाराजांनी उपोषण सुरू केलेले उपोषण स्थळी तहसीलदार जोपर्यन्त येत नाही व आमच्या भावना शासनाकडे पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही उपस्थित स्थळावरून उठणार नाही अशी भूमिका मनोहर भिला पाटील यांनी घेतली.

यावेळी घटनास्थळी निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार हे तात्काळ घटनास्थळी आले व उपोषणकर्त्यांची निवेदन स्वीकारून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवतो व आपल्या मागणीसंदर्भात कळवतो असे सांगितले.

त्यात नवरात्र महोत्सव मंदिरे लवकरात लवकर उघडावी अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असे या निवेदनात मनोहर भिला पाटील यांनी निवेदनात नमूद केले असून त्वरित मंदिरे न उघडल्यास आपण आमरण उपोषण सुरू करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या