अंधेरी पोटनिवडणूक निकाल : ऋतुजा लटके ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या (Andheri by-election) मतमोजणीला (Counting of votes) सकाळपासून सुरुवात झाली आहे. या मतमोजणीच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) आघाडीवर आहेत. तर नोटाला (Nota) दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सरासरी ३२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज अंधेरीतल्या गुंदवली महापालिकेच्या शाळेमध्ये (Gundvali Municipal School)निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या १९ फेऱ्या होणार असून ऋतुजा लटके यांना सहाव्या फेरीमध्ये २१०९० तर नोटाला ४३३८ मते मिळाली आहेत.

दरम्यान, एकूण २५६ मतदान केंद्रांवर ८१ हजार मतदारांनी (Voters)मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर आज एकाचवेळी १४ टेबलवर मतमोजणी सुरु असून एका टेबलवर एक ईव्हीएम मशिन म्हणजे प्रत्येकी १ हजार मतांची मतमोजणी होणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *