Thursday, April 25, 2024
Homeनाशिकखरेदीसाठी गर्दी; कापड दुकान सील

खरेदीसाठी गर्दी; कापड दुकान सील

नांदगाव। प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव शहरात मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न ठेवणे आदी नियमाचा दिवाळीपासून फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत होते. नुकतीच लग्नसराई सुरू झाल्याने अनेक दुकानात खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

अचानक तहसीलदार, पोलीस, नगरपरिषदेकडून रस्त्यावर उतरून कारवाईला सुरुवात करण्यात आली. या कारवाईत २२ जणांवर ५००० हजार रुपये दंडात्मक करण्यात आली तर एक कापड विक्री करणारे दुकान सीलबंद करण्यात आले आहे.

नांदगाव शहरात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी नांदगाव शहरात मास्क न वापरणे, दुकानात सुरक्षित अंतर न ठेवणे या बाबत .दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून विना मास्क फिरणाऱ्या व सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्या २२ नागरिकांवर पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली तर सराफ बाजारपेठतील कापड विक्री करणारे दुकान सीलबंद करण्यात आले आहे. पुढे कारवाई सुरू रहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या कारवाईत प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार उदय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संतोष मटकुळे, नगरपालिका अधिकारी राहुल कुटे,अतिष वालतुले वैभव चिचोंळे,मोनिका अचरे,रोशनी मोरे,अनिल बुरकुल, निलेश सपकाळे, अरुण निकम,राजु गरुड,रामकृष्ण चोपडे यांच्यासह नगरपरिषद,तहसील, पोलीस प्रशासनाने सहभाग घेतला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या