Sunday, May 5, 2024
Homeनगरकोतुळ ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालतोय अवघ्या एका वैद्यकीय अधिकार्‍यावर

कोतुळ ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालतोय अवघ्या एका वैद्यकीय अधिकार्‍यावर

कोतूळ (वार्ताहर)- ऐन करोना साथीच्या काळात अकोले तालुक्यातील कोतुळ येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चार वैद्यकीय अधिकारी आवश्यक असताना गेल्या काही दिवसांपासून एकाच वैद्यकीय अधिकार्‍याकडून कोतूळ ग्रामीण रुग्णालयाचा गाडा चालविला जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

ऐन करोना काळात वरिष्ठांचा हा निष्काळजीपणा सुरू आहे. तर लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांची मात्र हाल होत आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसामुळे जलजन्य आजार होत आहे. परवा सातेवाडी परिसरातील गॅस्ट्रॉचे अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. मात्र एकच अधिकारी असल्याने त्यांची धांदल उडाली. प्रत्येकाला तपासून उपचार करण्यात बराच वेळ निघून गेला. यात गंंभीर रुग्ण नसल्यामुळे गांभीर्य दिसून आले नाही.

- Advertisement -

कोतुळ ग्रामीण रुग्णालयाला मोठे कार्यक्षेत्र आहे. कळसुबाई हरीचंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील अनेक गावे आहेत. कोतुळ, कोहणे, ब्राम्हणवडा या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावांचा यात समावेश असून या ठिकाचे रुग्ण या कोतुळ ग्रामीण रुग्णालयात भरती केले जातात . आदिवासी व दुर्गम भाग असल्याने सर्पदंश, विंचू दंश, अपघात, गर्भवती महिलांची प्रसूती, नसबंदी शस्त्रक्रिया असे अनेक रुग्ण या ठिकणी येत असतात.

मात्र ग्रामीण रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकारी असताना अवघे एकच वैद्यकीय अधिकारी सध्या काम करत आहे. या ठिकाणी रुग्णालयात कायम स्वरूपी चार वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी करण्यात आली. सध्या करोना रुग्ण संख्या वाढत आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र आरोग्य विभागाला लोकांच्या आरोग्याची काळजी नसल्याची भावना व्यक्य होत आहे. ग्रामीण रुग्णालालयाला कायमस्वरूपी चार वैद्यकीय अधिकारी न दिल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कोतुळ ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या