Tuesday, April 23, 2024
Homeजळगावजिल्ह्यात 35 नवे बाधित रुग्ण तर 65 रुग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्यात 35 नवे बाधित रुग्ण तर 65 रुग्ण कोरोनामुक्त

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील आटोक्यात आली आहे. रविवारी जिल्ह्यात 35 नवे बाधित रुग्ण आढळून आले असून 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नसून जिल्ह्यात सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 772 वर पोहचली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 5, जळगाव ग्रामीण 1, भुसावळ 7, अमळनेर 2, चोपडा 2, पाचोरा 2, भडगाव 0, धरणगाव 2, यावल 2, एरंडोल 2, जामनेर 3, रावेर 2, पारोळा 1, चाळीसगाव 3, मुक्ताईनगर 1, बोदवड 0 व इतर जिल्ह्यातील 0 असे एकूण 35 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 221 एवढी झाली आहे. तर 1 लाख 38 हजार 879 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकही मृत्यूू नाही

गेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून रविवारी जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नसून आजपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 570 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात 772 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणार्‍याची संख्या तीन पट अधिक आहे. आज दिवसभरात 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सद्याच्यास्थितीला जिल्ह्यात 772 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या