Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याSinnar : सिन्नर-शिर्डी महामार्गावर धावत्या ट्रकने अचानक घेतला पेट

Sinnar : सिन्नर-शिर्डी महामार्गावर धावत्या ट्रकने अचानक घेतला पेट

वावी | वार्ताहर | Vavi

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील (Sinnar-Shirdi Highway) पाथरे गावाजवळ (Pathare village) धावत्या ट्रकने (Truck) अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते…

- Advertisement -

Nashik Crime News : पत्नीने केली मुलाच्या मदतीने पतीची हत्या

याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डीकडून सिन्नरकडे ( Shirdi to Sinnar) आयशर ट्रक क्रमांक (एमएच ०४ एल.ई. ९४१४) जात असताना ट्रकने अचानक पेट घेतला. यावेळी आगीत आयशर ट्रकची पुढची बाजू पूर्णपणे जळून खाक झाली. तर चालकाने ट्रक थांबवून तात्काळ ट्रकच्या बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वाचला असून ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचे चालकाचे म्हणणे आहे.

Nashik Crime : घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

दरम्यान, यावेळी नॅशनल हायवेचे टोल नाक्यावरील आपत्कालीनचे सुपरवायझर प्रशांत शिंदे व त्यांचे सहकारी दुर्गेश शिंदे, योगेश शिंदे यांना आयशर ट्रकला आग (Fire) लागल्याचे समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत पाण्याचा टँकर बोलावून आग विझवण्यास मदत केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या