Wednesday, April 24, 2024
Homeनगरनियमांचे उल्लंघन केल्यास आस्थापना 7 दिवस बंद

नियमांचे उल्लंघन केल्यास आस्थापना 7 दिवस बंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हात करोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. वाढत्या करोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून

- Advertisement -

करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच आता मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, या नियमांचे उल्लंघन एखाद्या आस्थापनामध्ये होत असेल, तर ती आस्थापना 7 दिवस बंद करण्यात येणार आहे.

तसे अधिकार तालुकास्तरावर तहसीलदार यांना व नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबत आदेश काढले आहेत. करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी मास्कचा व सॅनिटायझऱचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, या नियमांचे उल्लंघन करणार्‍या सर्व आस्थापनांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

त्यासाठीचे अधिकार ग्रामीण स्तरावर तहसीलदार यांना नगर नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर मुख्याधिकारी यांना दिले जात असल्याचे आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. हे अधिकारी 15 एप्रिल पर्यंत देण्यात आले असून कारवाईचा अहवाल हा जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावा, असेही आदेशात म्हंटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या