Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशतुमच्या खिशावर परिणाम करणारे हे नियम आजपासून बदलले

तुमच्या खिशावर परिणाम करणारे हे नियम आजपासून बदलले

मुंबई : आजपासून (१ ऑक्टोंबर) अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होण्याची शक्यता आहे. विमान प्रवास, मिठाई, गॅस सिलिंंडर, आरोग्य विम्यासह अनेक गोष्टींमध्ये महत्वाचे बदल झाले आहेत. या घटकांचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे.

आरोग्य विमा

- Advertisement -

विमा नियामक आयआरडीएआयच्या नियमांनुसार आरोग्य विमा पॉलिसीमध्येदेखील मोठे बदल केले आहेत. आरोग्य विम्यात समाविष्ट होणाऱ्या आजारांचीही संख्या वाढवण्यात आली आहे. मात्र यामुळे आरोग्य विम्याचा हप्ता महाग होणार आहे. आरोग्य विम्यात जास्त सुविधा मिळतील. एकदा पॉलिसी विकल्यानंतर ग्राहकाने क्लेम केल्यानंतर कंपनी मनमानी पद्धतीने तो क्लेम रद्द करू शकत नाही. विमासाठीचा वेटींग पिरियडही कमी होणार आहे. जर सलग ८ वर्ष पॉलिसी प्रिमीयम भरला असेल तर कोणतीही कंपनी क्लेम रद्दबातल करू शकत नाही.

मिठाईवर एक्स्पायरी डेट अनिवार्य

आजपासून मिठाईवर एक्स्पायरी डेट लिहीणे अनिवार्य असेल. मिठाईच्या दुकानदारांना आता त्यांच्या दुकानात उपलब्ध असलेल्या मिठाईची ‘बेस्ट ऑफ डेट’ जाहीर करावी लागेल. खाद्य नियामक FSSAI ने या दुकानदारांना १ ऑक्टोबरपासून नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. आता, मिठाईच्या दुकानात सर्व मिठाईसमोर ‘तारखेपूर्वीचे सर्वोत्कृष्ट’ असे नमूद करणे आवश्यक असेल.

टोल दरात वाढ

मुंबईत आजपासून आजपासून टोलच्या दरात ५ ते २५ रूपयांची वाढ होणार आहे. मासिक पासाचे दरही वाढतील. त्यामुळे महागाईत अधिकच भर पडेल.

मोहरी तेल

अन्न नियामक एफएसएसएआयने १ ऑक्टोबरपासून इतर कोणत्याही स्वयंपाकाचे तेल मोहरीच्या तेलात मिसळण्यास बंदी घातली आहे.

टीव्ही खरेदी करणे महागणार

१ ऑक्टोबरपासून टीव्ही उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या ओपन सेल पॅनेलवर ५% आयात शुल्क लागणार आहे.

क्रेडिट आणि डेबिट कार्डबाबत आरबीआयचे नवीन नियम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुरक्षित व्यवहारासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. नवीन नियमांनुसार आता कार्ड यूजर ऑनलाइन व्यवहार, आंतरराष्ट्रीय व्यवहारासोबत कॉन्‍ट्रैक्‍टलेस कार्ड ट्रांजेक्‍शन साठी ऑप्ट-इन किंवा ऑप्ट-आउट सर्विस रजिस्टर करण्यात समर्थ असतील.

ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीसारख्या कागदपत्रांच्या हार्ड कॉपी ठेवण्याचा ताण संपुष्टात येणार आहे. आता आपण वाहनाशी संबंधित या कागदपत्रांच्या वैध सॉफ्ट कॉपीसह वाहन चालवू शकता. आता, वाहनाशी संबंधित कागदपत्रे आणि ई-चालान पोर्टलद्वारे ठेवता येतील. नवीन नियमांनुसार, ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रांची गरज भासणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या