Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशाळा सुरु करण्याआधी व नंतरचे असे असतील नियम; वाचा सविस्तर

शाळा सुरु करण्याआधी व नंतरचे असे असतील नियम; वाचा सविस्तर

पुणे | प्रतिनिधी Pune

राज्यातील शाळा येत्या बुधवारपासून (Wednesday) म्हणजेच १ डिसेंबरपासून सुरू करण्यास राज्य शासनाकडून (State Government) मान्यता देण्यात आली आहे. असे असले तरीदेखील शाळा सुरू करण्यापूर्वी तसेच शाळा सुरु झाल्यानंतर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबतची नियमावली आरोग्य विभागाने (Health Department) जाहीर केली आहे.

- Advertisement -

कोरोना विषयक नियमांचा (covid terms and condition) भंग होणार नाही याची सर्वप्रथम काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा, विद्यार्थी, शिक्षकांसह (School, teachers and teachers) सर्वांनीच नियम पाळावयाचे आहेत. आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील (Dr Archna Patil) यांनी याबाबतच्या सूचना नुकत्याच दिल्या. प्रतिबंधित क्षेत्रातील (Containment zone) शाळा बंद ठेवाव्यात असे आवाहन केले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत येण्यास परवानगी देण्यात येऊ नये. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळेची स्वच्छता करावी. शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी पध्दत टाळावी. शिक्षक व विद्यार्थी संख्या विचारात घेऊन शाळेत मुबलक ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करावी.

शक्यतोवर शाळेत गर्दी होणारे खेळ सामूहिक प्रार्थना असे उपक्रम टाळण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. शाळेतील जलतरण तलाव सुरू करू नयेत. सर्वांनी फेसमास्क (Facemask), फेस कव्हर (Face cover), हॅन्ड सॅनिटायझर (Hand Sanitizer) यांचा पुरेसा साठा ठेवावा.

करोनाचे लक्षणे असणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास परवानगी देऊ नये. शाळेत दर्शनी ‘भागात कोरोना प्रतिबंधक संदर्भातील आरोग्य शिक्षण विषयक साहित्य लावावे. स्कूल बस मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहनात गर्दी होणार नाही याची नोंद घ्यावी.

आजारी विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेत येऊ नये. विद्यार्थी व शिक्षकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे शाळेत कोणालाही कोरोना विषयक लक्षणे अढळल्यास कोणत्या उपाय योजना कराव्यात अशी नियमावलीच आज आरोग्य विभागाने जाहीर केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या