Thursday, April 25, 2024
Homeनगररुई चोंडा येथील धबधब्याखाली बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

रुई चोंडा येथील धबधब्याखाली बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील रुई चोंडा धबधबा येथे रविवारी (दि. 25) 18 वर्षीय तरुण आंघोळ करत असताना धबधब्याजवळ खड्ड्यांमध्ये पडून बुडाला होता.

- Advertisement -

त्याचा मृतदेह मंगळवारी (दि. 27) पाण्यातून बाहेर येऊन तेथेच पोलिसांना सापडला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रेयश नवनीत जामदार (वय 18, रा. शिरूर घोडनदी) व त्याचे पाच मित्र रुई चोंडा धबधबा येथे फोटो काढण्यासाठी आले होते. याठिकाणी ते अंघोळ करत असताना त्यांच्यापैकी श्रेयश जामदार हा धबधब्याजवळ असलेल्या खड्ड्यामध्ये पडल्याने बुडाला.

धबधब्याच्या खाली असणारा तो खड्डा जवळपास 50 ते 60 फूट खोल आहे. त्या खड्ड्याच्या आतमध्ये कपारीला अडकला असण्याची शक्यता होती. त्यादृष्टीने पोलीस तपास करत होते. 46 तासांनंतर मृतदेह पाण्याबाहेर आला. त्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पथकासह पुढील कार्यवाही करत आहेत.

दरम्यान महिनाभरापूर्वी रूईचोंडा धबधबा येथे नगर येथील रेल्वे पोलीस बुडाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह काही दिवसांनी तेथून चार ते पाच किलोमीटर अंतरावर सापडला. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या