Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedई-बाईक तपासणीसाठी अभियांत्रिकीचा नकार

ई-बाईक तपासणीसाठी अभियांत्रिकीचा नकार

औरंगाबाद – aurangabad

मोटार वाहन कायद्याचे (Motor Vehicle Act) उल्लंघन करून (Electric e-bike) इलेक्ट्रीक ई-बाईकचा वेग वाढवण्याचा उपद्रव्यात करणार्‍या वितरकांकडून (rto) आरटीओ कार्यालयाने कारवाई करीत १२ ई-बाईक जप्त केल्या होत्या. यांपैकी पाच ई-बाईक्स शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (Government Engineering College) तपासणीसाठी पाठवल्या होत्या. मात्र, त्यांच्या तपासणीसाठी उच्च तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे अभियांत्रिकीने तपासणीस नकार कळवला आहे, अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली.

- Advertisement -

केंद्रीय मोटार वाहन कायद्याची पायमल्ली करत ई-बाईकचा वेग वाढविण्यासाठी अधिकच्या क्षमतेची बॅटरी लावून ग्राहकांच्या जिवाशी खेळ करत असलेल्या शहरातील ५ ते ७ ई-बाईक वितरकांवर नुकतीच आरटीओ कार्यालयाने कारवाई केली. यात जप्त ई-बाईक या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवल्या होत्या. जप्त केलेल्या ई-बाईक्सची तांत्रिक तपासणी केल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येणार होती. मात्र शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने ई- बाईकची तांत्रिकदृष्या तपासणी करण्यासाठी उच्च प्रतीच्या दर्जाची साधन सामुग्री उपलब्ध नसल्याचे कारण देत अहवाल देण्यास असमर्थता दर्शवली आहे. या तांत्रिक अडचणी मुळे हा बदल उत्पादकांनी केला की वितरकांनी केला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र वितरकांविरुद्ध लवकरच दुंडात्मक कारवाई करणार असल्याचे मेत्रेवार यांनी स्पष्ट केले.

एक लाखाचा दंड करणार

संबंधित वितरकांविरुद्ध केंद्रीय मोटार वाहन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी प्रत्येकी एक लाखाचा दंड वसूल करण्यात येणार आहे. यात शहरातील ५ ते ७ वितरकांचा समावेश आहे, असेही संजय मेत्रेवार यांनी नमूद केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या