आरटीओ व वाहतूक शाखेच्या माध्यमातून शिर्डीत मोठी कारवाई

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

पोलीस निरीक्षक हिरालाल पाटीलशिर्डी वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने काल शिर्डी शहरात अवैध प्रवासी वाहतूक, चार चाकी, मॅजीक, अ‍ॅपे रिक्षा, दुचाकी वाहनावर कारवाई करत 12 वाहने जप्त करुन या कारवाईत 88 हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी दिली

जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहरातील अवैध वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी त्याबरोबरच विना कागदपत्र परमिट नसलेले वाहने नाकाबंदी करू ताब्यात घेण्यात आली. या कारवाईची माहिती वाहनधारकांना मिळताच अनेक वाहने रस्त्यावरून परागंदा झाली होती. अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या अनेक वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करून वाहतुकीला देखील अडथळा निर्माण करीत होते.

वेळोवेळी सूचना देऊन देखील सुधारणा होत नसल्याने अशा स्वरूपाच्या कारवाया सुरू करण्यात आल्याचे सांगत या पुढील काळात देखील अशाच प्रकारची कारवाई शिर्डी वाहतूक शाखेकडून सुरूच राहणार असल्याचे संकेत देऊन काही वाहनधारक प्रवाशांची अडवणूक करून जास्त भाडे घेत असल्याच्या तक्रारी देखील वाहतूक विभागाला प्राप्त झालेल्या होत्या. त्यामुळेही मोहीम अत्यंत कडकपणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या कारवाईत अनिल पाटोळे, राजेश सुर्यवंशी, संतोष बनकर, पांडुरंग घुमरे, सुरज गायकवाड, रवि साठे, राजु थोरात, राहुल सारबदे आदी वाहतूक पोलिसांनी भाग घेतला.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *