आज मध्यरात्रीपासून RTGS सेवा २४ तास

दिल्ली | Delhi

आता अनेकांसाठी डिजिटल आर्थिक व्यवहार करणं सुकर होणार आहे. RBI च्या निर्णयानुसार सोमवार, १४ डिसेंबर २०२० पासून भारतात २४ तास आरटीजीएस (RTGS) सेवा उपलब्ध होणार आहे.

गेल्या वर्षी पासून NEFT सेवा २४ तास उपलब्ध झाली. आता RTGS २४ तास उपलब्ध होणार असल्यामुळे मोठा फायदा होईल. ऑक्टोबर 2020 मध्येच आरबीआयचे पतधोरण जाहीर करताना याची घोषणा करण्यात आली होती. आज आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पुन्हा त्याची माहिती दिली आहे.

आर्थिक व्यवहारांचा वेग वाढावा यासाठी आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस या सेवा २४ तास उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला आहे. भारतात ऑनलाइन व्यवहार वाढत आहेत, त्यामुळे आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस २४ तास करण्याची शिफारस नंदन नीलकेणी (Nandan Nilekani) यांच्या समितीने रिझर्व्ह बँकेला (Reserve Bank of India – RBI) केली होती. ही शिफारस मान्य करत रिझर्व्ह बँकेने टप्प्याटप्प्याने आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस या सेवा २४ तास उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. सर्वात आधी आयएमपीएस २४ तासांसाठी उपलब्ध झाले. पाठोपाठ डिसेंबर २०१९ पासून एनईएफटी सेवा २४ तास उपलब्ध झाली.

देशामध्ये डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी याकरिता आरबीआयने जुलै २०१९ पासून RTGS, NEFT वरील सेवाशुल्क काढून टाकले आहे. हा व्यवहार निशुल्क केला जाऊ शकतो. RTGS करण्यासाठी व्यवहार किमान २ लाख रूपयांचा असणं गरजेचे आहे. पण कमाल मर्यादा नाही. त्यामुळे जास्तीत जास्त कितीही रूपये ट्रांसफर केले जाऊ शकतात.

NEFT आणि RTGS व्यवहार हे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी असले तरीही पूर्वी त्यामध्ये वेळेस, बॅंकेच्या व्यवहारांच्या वेळेचे, सुट्टीचं बंधन होतं. मात्र आता या दोन्ही सेवा २४ तास खुल्या केल्या आहेत. NEFT मध्ये किमान, कमाल मर्यादा नाही. तर RTGS हे मोठ्या व्यवहारांसाठी आहे. ज्यात किमान 2लाखापासूनची रक्कम ट्रांसफर करण्यासाठी वापरली जाते. पण या व्यवहारातही कमाल मर्यादा नाही. पूर्वी आरटीजीएसने व्यवहार करायचा असल्यास तो कामाच्या दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेमध्येच केला जात असे. दरम्यान बॅंकेच्यावेळेनुसार त्याच्या सेटलमेंटच्या वेळा आणि व्यवहारांच्या वेळा बदलत होत्या.

आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस या तिन्ही सेवा कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी वापरण्याची सोय केल्यानंतर भारताचा वेगाने ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या निवडक देशांमध्ये समावेश होईल.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *