Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशसरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह

सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह

मुंबई | Mumbai

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना करोनाची लागण झाली आहे….

- Advertisement -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. नागपूर येथील किंग्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

RSS ने माहिती देताना सांगितलं आहे की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आज दुपारी करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांच्यात सध्या कोरोनाची सामान्य लक्षणे आढळून आली आहेत. खबरदारी म्हणून त्यांना नागपूरच्या किंग्सवे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.’

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांना रुग्णालयातील करोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या