Friday, April 26, 2024
Homeक्रीडाIPL 2022 : बंगळूर-पंजाब आज आमनेसामने, कोण मारणार बाजी?

IPL 2022 : बंगळूर-पंजाब आज आमनेसामने, कोण मारणार बाजी?

मुंबई | Mumbai

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (Royal Challengers Bangalore) संघाने आपली विजयी मोहीम कायम राखली आहे. आज बंगळूर संघाचा सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या सीसीई ब्रेबॉर्न क्रिकेट मैदानावर सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येणार आहे….

- Advertisement -

बंगळूर संघाचे १२ सामन्यांमध्ये १४ गुण आहेत. आजच्या सामन्यात विजय संपादन करून बाद फेरी निश्चित करण्यासाठी बंगळूर सज्ज आहे. आयपीएल गुणतालिकेत बंगळूर संघ (RCB) सध्या चौथ्या स्थानी आहे.

आजच्या सामन्यात विजय मिळवून अव्वल २ संघांमध्ये आपलं स्थान निश्चित करण्याची संधी बंगळूर संघाला आहे. शिवाय आजच्या सामन्यात विजय मिळवून विजयीं षटकारासाठी पंजाब किंग्ज (Punjab Kings) सज्ज असणार आहे.

पंजाब किंग्ज (PBKS) संघाने आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाची अडचण वाढणार आहे. पंजाबकिंग्ज संघाच्या खात्यात ११ सामन्यांमध्ये ५ विजय आणि ६ पराभवांसह १० गुण आहेत .

बाद फेरीतील आपलं स्थान नक्की करण्यासाठी पंजाब किंग्ज संघाला आपले उर्वरीत ३ सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. यंदाच्या हंगामात बंगळूर आणि पंजाब किंग्ज दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत.

डीवाय पाटील येथे झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात पंजबाकींग्ज संघाने बंगळूर संघाला पराभवाची धूळ चारली होती. या पराभवाची सर्रास परतफेड करण्याची संधी आज बंगळूर संघाकडे असणार आहे.

यंदाच्या हंगामात बंगळूर संघावर दुसऱ्यांदा मात करण्यासाठी पंजाब किंग्ज नव्या रणनीतीसह आज मैदानात उतरण्याची शक्यता आहे. विराट कोहलीचे फलंदाजीतील अपयश ही संघासाठी चिंतेची बाब आहे. आजच्या सामन्यात दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, शिखर धवन, लियम लिंगविस्टन हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या