Saturday, April 27, 2024
Homeधुळेरेल्वेमार्गाच्या जमीन मोजणीसाठी वापरणार रोव्हर मशीन

रेल्वेमार्गाच्या जमीन मोजणीसाठी वापरणार रोव्हर मशीन

धुळे। Dhule प्रतिनिधी

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गातील (Manmad-Dhule-Indore railway line) बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी (Borvihir to Nardana railway line) जुलै महिन्यात जमीन मोजणी (Land survey) केली जाणार आहे. त्यासाठी पहिल्यांदाच रोव्हर मशीनचा (Rover machine) वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे तीन महिन्यांचे काम अवघ्या एकाच महिन्यात होईल. दरम्यान रोव्हर मशीनचा वापर करण्यासाठी जिल्ह्यातील 24 अधिकार्‍यांना प्रशिक्षण (Training to officers) देण्यात आले आहे. या रेल्वेमार्गासाठी धुळे आणि शिंदखेडा तालुक्यात 200 हेक्टर भूसंपादन होईल.

- Advertisement -

बोरविहीर ते नरडाणा रेल्वे मार्गामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्ग जोडले जाणार आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गाचे काम होणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. धुळे तालुक्यातील 19 व शिंदखेडा तालुक्यातील 5 गावातून 200 हेक्टर जमीन संपादित होणार आहे. भूसंपादनासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. जमिनी मोजणीचे काम जुलै महिन्यात सुरू होईल. हे काम रोव्हर यंत्राच्या मदतीने होईल. जिल्ह्याला पाच रोव्हर यंत्र उपलब्ध झाले आहे. या यंत्राचे काम कन्टिन्युअसली ऑपरेटिंग रेफरन्स सिस्टिमच्या माध्यमातून चालेल.

या केंद्राचा संपर्क थेट उपग्रहाशी असेल. त्यामुळे जमिनीची अचूक मोजणी होईल. रोव्हर मशीनमुळे हे काम एक महिन्यात होईल. रोव्हर मशीन चालवण्याचे 25 जणांना प्रशिक्षण दिले आहे. इन हाऊस आणि फिल्डवर प्रशिक्षण दिलेले असून त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रेल्वेमार्गासाठी जमीन मोजणीला सुरुवात होईल.

ही मोजणी विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी पाचही मशीनचा वापर करण्यात येईल. एक महिन्यात काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती भूमिअभिलेख कार्यालयाचे जिल्हा अधीक्षक प्रशांत बिलोलकर यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या