Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसातपूरला पोलिसांचे पथ संचलन

सातपूरला पोलिसांचे पथ संचलन

सातपूर | प्रतिनिधी Satpur

गणेशोत्सवात उत्साह काही अंशाने कमी झालेला असला तरी विसर्जनात कार्यकर्त्यांनी गोंधळ करू नये तसेच येणाऱ्या मोहरम मध्ये शांतता राहावी या उद्देशाने पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्या नेतृत्वाखाली सातपूर पोलिस ठाण्या पासून रूट मार्च काढण्यात आला होता.

- Advertisement -

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गणेशोत्सव या निमित्ताने सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये रुटमार्च काढण्यात येत असतो. लोकांना आकृष्ट करण्यासाठी आपण सुरक्षित आहात हे सूचित करण्यासाठी रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते

शहरात वाढता करोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघणार नसल्या तरी सुरक्षिततेच्या बाबत लोकांना आश्वस्त करण्याच्या गोष्टींवर रूट मार्च काढण्यात आलेले होता. जनतेमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून हा उपक्रम दरवर्षी करण्यात येत असतो.

त्यामध्ये आम्ही सातपूर पोलीस स्टेशन पासून स्वारबाबा नगर, राजवाडा, सातपूर गावमार्गे महिंद्रा सर्कल पर्यंत रूट मार्च काढून परत पोलीस स्टेशन पर्यंत आणण्यात आला.

त्याच्यामध्ये एसीपी झोन 3 अशोक नखाते यांच्या नेतृत्वाखाली अंबड-सातपूर आणि इंदिरानगर प्रभारी अधिकारी, यासोबतच पोलीस इन्स्पेक्टर आणि दहा सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला. तसेच क्यूआरटी, आरसीपी, एसआरसीएफ प्लाटून व परिमंडल-2 चे स्ट्रायकिंग फोर्स इतर अधिकारी त्यांचे कर्मचारी आणि सर्व कर्मचारी त्यामध्ये सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या