Thursday, April 25, 2024
Homeनाशिकरोटी-बेटी व्यवहार ठराव मंजूर

रोटी-बेटी व्यवहार ठराव मंजूर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सुवर्णकार समितीतर्फे (OBC Suvarnakar Samiti) राजयोग मंगल कार्यालयात द्वितीय वधू-वर मेळावा (Get To Gether) उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्यभरातील सुवर्णकार समाजातील पालक व मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते…

- Advertisement -

सुवर्णकार समाजातील १८ पगड जाती व पोट जातींचा रोटी बेटी व्यवहार (Roti Beti Transaction) व्हावा असा ठराव एक मुखाने संमत करण्यात आला. ठरावाला उपस्थित मान्यवर व संपूर्ण समाजातील प्रतिनिधींनी एकमताने मंजूरी दिली. तसेच आयोजक गजू घोडके (Organizer Gaju Ghodke) यांची सर्वांनी हात उंचावून नेतेपदी निवड केली. यावेळी विवाह इच्छूक मुले-मुली मोठया प्रमाणात उपस्थित होते.

तसेच सोनार समाजातील (Sonar Society) सर्व पोट जातींनी एकत्र येत रोटी बेटी व्यवहार करावा जेणेकरून आपला समाज वाढेल असे विचार भारतीय अध्यक्ष पुष्पा सोनार (Pushpa Sonar) यांनी मांडले. यावेळी काही पालकांना प्रवास भत्ता देण्यात आला.

तर मेळावा प्रमुख राजा कुलथे, संजय मंडलिक, अर्चना दिंडोरकर, धनराज विसपुते, पुष्पा सोनार, भास्करराव मैंद, सुरेश बागुल, राहुल जाधव, भास्करराव वडनेरे, यांच्यासह सोनार समाजातील पालक, मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या