Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकनिर्माल्यापासून खत, रंग, धूप, अगरबत्तीची निर्मिती

निर्माल्यापासून खत, रंग, धूप, अगरबत्तीची निर्मिती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सण-सणावारांमध्ये ‘निर्माल्य ’नद्यांमध्ये, तलावांमध्ये सोडले जाते. ज्या मुळे फार मोढ्या प्रमाणात जलप्रदूषण होते ( Water Pollution). हे जलप्रदूषण रोखण्याचा साधा आणि सोपा मार्ग म्हणजे निर्माल्यापासून ’कंपोस्ट खत’ तयार करणे होय…

- Advertisement -

कंपोस्ट खत (Compost manure) हे शेतीसाठी आणि बागांसाठी अत्यंत कमी खर्चात तयार होणारे खत आहे. नैसर्गिक रित्या तयार झालेले हे खत अत्यंत उपयोगी असते. जास्तीत जास्त लोकांमध्ये या विषया संदर्भात जनजागृती व्हावी म्हणून रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये डसबिन ठेवण्यात येणार असल्याची माहीती रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीचे अध्यक्ष राजेश सिंघल, सेक्रेटरी डॉ. संगिता लोढा यांनी दिली.

यामध्ये विशेष म्हणजे धूप (Incense) व अगरबत्ती (Agarbatti) तयार करण्यासाठी महिलांना रोजगार मिळणार आहे. तसेच रंगपंचमीसाठी वापरण्यात येणारा रंगही यापासून तयार होण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. अनिता भामरे, प्रकल्प प्रमुख दिप्ती जानोरकर, डॉ. अमोल जगदाळे, संगिता जगदाळे, मेघना नाठे, सोनाली लुटे, अमित पगारे, हेमलता सिंघल, किरण सागोरे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या