Friday, April 26, 2024
Homeनाशिकचिंचवे येथे घराचे पत्रे उडून शेतकऱ्याचा संसार उघड्यावर

चिंचवे येथे घराचे पत्रे उडून शेतकऱ्याचा संसार उघड्यावर

दहिवड | वार्ताहर | Dahiwad

अवकाळी पावसामुळे देवळा तालुक्यातील चिंचवे शिवारात एका शेतकरी कुटुंबाच्या राहत्या घराचे पत्रे उडाल्याने घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, धान्य, महत्वाचे कागदपत्र भिजून घर मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे…

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार चिंचवे येथील युवराज भीमराव पगारे यांच्या राहत्या घराचे पत्रे हे वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने उडून गेले. या गरीब कुटुंबाला रात्र उघड्यावर काढावी लागली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

घर कर्ज प्रकरणासाठी गावठाणाचा बनावट दाखला; एकावर गुन्हा दाखल

या घटनेबाबत चिंचवे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व महसूल प्रशासनाने पंचनामा करून कुटुंबाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आली आहे.

त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांशी चर्चा न करताच…; शरद पवारांनी व्यक्त केलं मत

- Advertisment -

ताज्या बातम्या