Friday, April 26, 2024
Homeनगररोजगार हमीच्या खर्चात 17 कोटींची वाढ

रोजगार हमीच्या खर्चात 17 कोटींची वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एकेकाळी हाताला काम आणि पोटासाठी दाम अशी ओळख असणार्‍या रोजगार हमी योजनेचे स्वरूप आता बदलेले आहे. पूर्वी रोजगार हमीतून केवळ रस्ते तयार करणे, वृक्ष लागवड, उन्हाळ्यात डोंगरात विविध चर घेणे यासह ठराविक कामे घेण्यात येत होती. मात्र, रोजगार हमी योजनेतील कामांची संख्या वाढली असून याचा परिणाम योजनेतून होणार्‍या खर्चावर देखील झाला आहे. गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत नगर जिल्ह्यात रोजगार हमीवरील सर्व प्रकारच्या खर्चाचा आकडा 17 कोटींनी वाढला आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात 14 तालुके असून यातील अपवाद वगळा तर उर्वरित तालुक्यात रोजगार हमीच्या कामांना मोठी मागणी असते. आता तर या विभागाने ऑनलाईन जॉबकार्ड अन्य काही ऑनलाईन सुविधा मतजूरांना उपलब्ध करून दिल्या आहेत. पूर्वी रजिष्टवर मजूरांची उपस्थिती आणि हातावर मिळणारी मजूरी देखील आता मजूरांच्या थेट बॅक खात्यात जमा होतांना दिसत आहे. याचा परिणाम रोजगार हमी योजनेच्या खर्चावर होत असून वाढलेला खर्च हा कुशल आणि अकुशल कामाच्या रूपाने संबंधीत मजूरांच्या पदरात पडतांना दिसत आहे.

नगर जिल्ह्यात 2021-22 मध्ये नगर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत कुशल आणि अकुशल कामांवर 70 कोटी 19 लाखांचा खर्च झाला होता. त्यानंतर 2022-23 मध्ये 17 कोटींची वाढ झाली असून या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील रोहयावरील खर्चाचा आकडा हो 87 कोटी 2 लाख रुपये झाला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा कुशल कामांवरील खर्च हा 40 टक्क्यांपर्यंत झालेला आहे.

रोहयातून आता ही कामे घेता येत असून यात ‘अ’ वर्गात जलसंधारणविषयक सिमेंट नाला बांध, दगडी नाला बांध, गॅबियन बंधारे, शोषखड्डे, सार्वजनिक शोषखड्डे, सलग समतल चर, पाझर तलाव दुरूस्ती, जमीन सपाटीकरण, गाळ काढणे, वनीकरण, रस्तादुतर्फा वृक्षारोपण, रोपवाटिका या कामांचा समावेश असून ‘ब’ वर्गात सिंचन विहीर, सार्वजनिक विहीर, शेततळे, फळबाग लागवड, रेशीम उत्पादन, बांधावरील वृक्ष, घरकूल, सामूहिक गोठे, मत्स्यपालन तर ‘क’ वर्गात शौचालय, रस्ता खडीकरण, मुरमीकरण, सिमेंट रस्ता, डांबर रस्ता, ग्रामसंघ इमारत, बाजार ओटा, स्मशानभूमी शेड, सार्वजनिक ठिकाणी सुशोभिकरण करण्यात येत आहेत. चालू वर्षी ‘ड’ वर्गात मोडणार्‍या नावीन्यपूर्ण योजनेत गुरांचा गोठा, शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड, नापेड कंपोस्ट, सार्वजनिक जागेवरील गोदाम, शाळा, अंगणवाडीकडे जाणारा रस्ता, खेळाचे मैदान, शालेय स्वयंपाकगृह, शालेय संरक्षक भिंत, अंगणवाडी बांधकाम, अंगणवाडी इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी कामे होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या