Monday, April 29, 2024
Homeनगररोडरोमीओला तीन वर्षे सक्त मजुरी

रोडरोमीओला तीन वर्षे सक्त मजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मिनीनाथ चव्हाण (वय 24) जीएसपी इंम्पोरीयम अपार्टमेंट, नाना चौक तपोवन रोड, नगर याने पिडीत फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही गंगा उद्यान रोडने भावासोबत सायकलवरून घरी जात असतांना तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी अतिरिक्त व विशेष (पोक्सो कोर्ट) जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी मोरे यांच्या न्यायालयात सुनावणी होवून आरोपी चव्हाण यास दोषी धरत विनयभंग लहान मुलांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम 8 नुसार 3 वर्षे सक्त मजुरी व एक हजारांचा दंड, तसेच न भरल्यास 1 महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले.

- Advertisement -

याप्रकरणाची हकीगत, अशी ऑगस्टला 2021 रोजी पिडीत मुलगी ही संध्याकाळी 7 वाजता तिचा लहान भावासोबत क्लासवरून घरी येत होती. दोघे गंगा उद्यानच्या बाजूला पंकज कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावरून जातांना आरोपी चव्हाण हा त्याच्या मोटार सायकलवरून पाठीमागून पुढे गेला व थोडा पुढे जावून पिडीत मुलीला पाहून त्याने त्याची मोटारसायकल वळून पुन्हा मागे आला. घटना ठिकाणी अंधार असल्याचा तसेच पिडीत मुलगी व तिच्या भावासोबत दुसरी मोठी कोणी व्यक्ती नसल्याचे पाहून आरोपीने पिडीत मुलगी हिची छेड काढली.

त्यामुळे पिडीत मुलगी हिने घाबरून जोराने ओरडली. घटनेनंतर आरोपी त्याची मोटारसायकल भरधाव वेगाने घेवून पळून गेला. ही घटना पिडीत मुलीने घरी आल्यानंतर तिच्या घरच्यांना सांगितली. त्यानंतर पिडीत मुलगी व तिचे वडील व काका यांनी आरोपीचा परिसरात शोध घेतला असता, आरोपी गंगा उद्यान जवळ त्याच्या मोटारसायकलसोबत सापडला. पिडीत मुलीच्या घरच्यांनी व जमलेल्या इतर लोकांनी आरोपीस पकडून तोफखाना पोलिस स्टेशनला घेवून गेले.

त्या ठिकाणी पिडीत मुलीने तोफखाना पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. घटनेचा तपास सहायक पोलीस निरिक्षक रविंद्र पिंगळे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी, पंच साक्षीदार तपासी अधिकारी, वयासंदर्भात मुख्याध्यापक तसेच महानगर पालिका यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यावेळी सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस न्यायालयाने चव्हाण यास शिक्षका सुनावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या