ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आला ‘रोबो’

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | Nashik

नेहमीच नवनवीन प्रयोग करणाऱ्या एस्पालियर स्कूलमध्ये (Espalier School) यंदा स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण चक्क एका रोबोच्या (Robo) हस्ते करण्यात आले.

आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात येत आहे. भविष्यातला भारत कसा असेल आणि विद्यार्थ्यांसमोर कुठल्या पद्धतीचे आव्हान असतील, याचा विचार करून इस्पॅलियर स्कूलने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर करून रोबोट बनवला.

शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला रोबो हाच प्रमुख पाहुणे म्हणून १५ ऑगस्ट निमित्त शाळेत आला आणि त्याच्या हस्तेच शाळेतील ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रयोगामागे शिक्षण अभ्यासक सचिन जोशी (Sachin Joshi) यांनी या कुत्रिम बुद्धीमत्तेच्या वापर करून बनवला. ते म्हणाले की, टेक्नॉलॉजीचा वापर करून भारतातील विविध समस्या सोडवण्यासाठी नवीन पिढीला तयार करणे हा आहे.

एस्पालियर स्कूल एकविसाव्या शतकातील स्किल्स विद्यार्थ्यांमध्ये आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते आणि विद्यार्थ्यांना नेहमी टेक्नॉलॉजीचा वापर समाजाच्या तळागाळा पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना तयार करत असते. हा नव्या पिढीचा नवा भारत आहे. हा रोबो क्षितिज कुलकर्णी, आर्या पगारे, निहारिका साठे, भाविन बागमार आणि हितेन पेरकर या आठवीच्या विद्यार्थ्यांनी बनवला.

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे शिक्षक सोनू कदम आणि स्नेहल दीदी यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका अंकिता कुर्या, सबा खान आणि चेअरमन डॉ. प्राजक्ता जोशी यांनी याला प्रोत्साहन दिले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *