Thursday, April 25, 2024
Homeनगरशिक्षकाच्या घरावर दरोडा

शिक्षकाच्या घरावर दरोडा

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील कार्थळवाडी या ठिकाणी दरोडेखोरांनी रात्रीच्यावेळी वस्तीवर राहणार्‍या शिक्षकाच्या घराच्या दरवाजाचे

- Advertisement -

कुलूप तोडून आत प्रवेश केला व दाम्पत्यास मारहाण करीत सोन्याच्या दागिन्यांसह 3 लाख 21 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शिक्षक हरिश्चंद्र बाजीराव काळे यांच्या वस्तीवर रविवारी (दि. 21) रात्री 2.30 वाजेच्या सुमारास ही घरफोडीची घटना घडली.

या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मेंढवण शिवारात कार्थळवाडी या ठिकाणी शिक्षक हरिश्चंद्र बाजीराव काळे यांची वस्ती आहे. रात्रीच्यावेळी काळे दाम्पत्य घरात झोपलेले होते. दरम्यान रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी काळे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांजवळ कुलूप तोडण्याचा लोखंडी पान्हा, गज, दांडके, स्क्रू ड्रायव्हर असे साहित्य होते. दरोडेखोरांनी मारलेले दांडके हरिश्चंद्र काळे यांच्या बरगडीस लागले. काळे दाम्पत्यास मारहाण करीत दरोडेखोरांनी अर्धा तास खुर्चीवर बसवून ठेवत घरातील साहित्याची उचकापाचक केली. काळे दांपत्यास धमकावत 56 ग्रँम वजनाचे 1 लाख 57 हजार रु. किंमतीचे एक सोन्याचे गंठण, 20 ग्रँम वजनाचे 60 हजार रुपये किंमतीचे एक सोन्याचे मिनीगंठण, 5 ग्रँम वजनाचे 15 हजार रुपये किंमतीची एक सोन्याची ठुशी, 10 ग्रँम वजनाचे 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातील झुबे, 3 ग्रँम वजनाची 9 हजार रुपये किंमतीची एक सोन्याची अंगठी, कपड्यांसह कपड्याची बँग, 2 हजार रुपये किंमतीचे तीन लेडीज व एक जेंन्ट्स घड्याळ, 2 हजार रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा एक मोबाईल त्यात 2 सिमकार्ड, 1 हजार रुपये किंमतीचा एक नोकीया कंपनीचा मोबाईल फोन सिमकार्डसह, कपाटात ठेवलेली 45 हजार रुपये रोख रक्कम त्यात 2 लाख 76 हजार रुपये किंमतीचे दागीने व 45 हजार रुपये रोख रक्कम असा मिळून एकुण 3 लाख 21 हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. त्यानंतर दरोडेखोर स्विफ्ट कारमधून पसार झाले. स्विफ्ट कारमध्ये आणखी एक दरोडेखोर बसलेला असावा अशी शक्यता श्री. काळे यांनी व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पो. हे. कॉ. विष्णू आहेर, पोलीस नाईक बाबा खेडकर, आण्णासाहेब दातीर, यमना जाधव, नितीन शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची चौकशी व तपास सुरु केला. तातडीने घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. श्वानाने मुख्य रस्त्यापर्यंतच माग काढला.

हरिश्चंद्र काळे हे कोतूळ ता. अकोले येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. घरफोडी प्रकरणी हरिश्चंद्र बाजीराव काळे ( वय 52 धंदा- शेती व नोकरी ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार घरफोडी करणार्‍या चोरट्यांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 128 / 2021 भा.द.वि. 457, 380 कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर अधिक तपास करीत आहे. घरफोडीच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मेंढवण शिवारात रात्रीच्या सुमारास घरफोडीची घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या घरफोडीच्या घटनेचा कसून तपास सुरु केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या