Friday, April 26, 2024
Homeनगरदरोड्याच्या तयारीतील टोळी शस्त्रासह अटकेत

दरोड्याच्या तयारीतील टोळी शस्त्रासह अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी गावठी बनावटीचे पिस्तूल व घातक शस्त्रासह अटक करण्यास नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. नगर तालुक्यातील वडगाव तांदळी शिवारात शनिवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. चौघांना अटक करण्यात आली असून एक जण पसार झाला आहे.

- Advertisement -

अटक केलेल्या चोरट्यांकडून एक लाख 13 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अजय गजानन काळे (वय 20 रा. तांबेमळा, बुरूडगाव ता. नगर) शक्ती भागुजी भोसले (वय 30), गिरधर पुंजाबाप्पु भोसले (वय 50, दोघे रा. निमगाव चोभा, ता. आष्टी जि. बीड), हरिदास आगुचंद काळे (वय 45 रा. वाकी ता. आष्टी, जि बीड) यांना अटक करण्यात आली आहे. तर हर्षल हबर्‍या काळे (रा. देऊळगाव सिद्धी ता. नगर) हा पसार झाला आहे. पाच जणांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर तालुक्यात चोर्‍या, घरफोड्या, जबरी चोर्‍यांचे प्रमाण वाढल्याने सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक युवराज चव्हाण, उपनिरीक्षक रणजित मारग, अंमलदार भगवान गांगर्डे, सोनवणे, सरोदे, लगड, ठाणगे, शिंदे, खेडकर, बांगर, बोराडे, जाधव यांचे पथक नगर तालुका हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन करत असताना निरीक्षक सानप यांना माहिती मिळाली आहे, की अजय गजानन काळे हा त्याच्या चार ते पाच साथीदारांसह तीन दुचाकीवरून घातकी हत्यारासह रूईछत्तीशी ते वडगाव तांदळी जाणर्‍या रोडने कुठेतरी दरोडा घालण्यासाठी जात आहेत.

पोलिसांच्या पथकाने वडगाव तांदळी शिवारात सापळा लावून अजय काळे हा व त्याचे साथीदार येण्याची वाट पाहत रोडचे कडेला झाडाझुडपाचे आडबाजुला दबा धरून बसले असता रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास रूईछत्तीशी बाजुकडुन वडगाव तांदळी गावाकडे काही इसम दुचाकीवर येताना दिसले. तेव्हा पोलिसांच्या पथकाने त्यातील चौघांना पकडले. त्यांच्या अंगझडतीमध्ये गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, दुचाकी, मोबाईल, चाकू असा एक लाख 13 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

सदरचे इसम हे कोठेतरी दरोडा टाकण्याचे तयारीत असल्याची खात्री झाल्याने पोलिसांनी त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करत अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील (नगर ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दोघे सराईत गुन्हेगार

अजय गजानन काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द यापूर्वी नगर तालुका पोलीस ठाण्यात दरोडा, फसवणूक या कलमान्वये गुन्हा दाखल आहे. तसेच पसार झालेला हर्षल हबर्‍या काळे याच्याविरूध्द नगर तालुका, श्रीगोंदा, बेलवंडी, पारनेर, दौंड (जि. पुणे) या पोलीस ठाण्यात दरोडा, दरोड्याची तयारी, फसवणूक, चोरी आदी गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या