Friday, May 10, 2024
Homeनगरदरोड्याच्या तयारीत असणारे तिघे दरोडेखोर राहुरी पोलिसांच्या ताब्यात

दरोड्याच्या तयारीत असणारे तिघे दरोडेखोर राहुरी पोलिसांच्या ताब्यात

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना राहुरी पोलीस पथकाने मुसक्या आवळून ताब्यात घेतले. तर दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. ही घटना राहुरी शहर हद्दीत नगर-मनमाड राज्य महामार्गावर दि. 18 सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली. या घटनेतील पाच आरोपी हे दि. 18 सप्टेंबर रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास राहुरी शहर हद्दीत नगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी कॉलेजच्या कमानी जवळ दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसले होते.

- Advertisement -

गुप्त खबर्‍याकडून ही खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. मात्र दोनजण अंधाराचा फायदा घेऊन मोटारसायकलवर पसार झाले. पोपट शंकर शेलार, वय- 29 वर्षे, मुळ राहणार चांदा, ता. नेवासा. हल्ली राहणार शाहुनगर, राहुरी बुद्रुक, संतोष राजु शेलार, वय- 25 वर्षे, राहणार इंगळे वस्ती, शाहुनगर, राहुरी बुद्रुक, सोमा मोहन बर्डे वय- 22 वर्षे, राहणार अण्णा शेटे वस्ती, शाहुनगर, राहुरी बुद्रुक, अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

तसेच दोन अनोळखी इसम होते. ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांकडून चाकू, लोखंडी गज, मिरची पूड, रस्सी व एक मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार पोपट दशरथ कटारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पोपट शेलार, संतोष शेलार, सोमा बर्डे व दोन अनोळखी इसम अशा पाच जणांवर दरोड्याच्या तयारीत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निरज बोकील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या